फोटो सौजन्य: Gemini
होंडा ॲक्टिव्हा 6G ही स्कुटर सामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरत आहे. विश्वासार्ह इंजिन आणि i3S तंत्रज्ञानामुळे ही स्कुटर इंधन बचतीसाठी ओळखली जाते. कंपनीकडून सुमारे 60 kmpl पर्यंत मायलेज दिले जाते. यामध्ये ट्युबलेस टायर्स देण्यात आल्यामुळे पंक्चरची शक्यता कमी होते आणि सुरक्षितताही वाढते.
Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या
होंडा कंपनीची Dio ही स्टायलिश आणि किफायतशीर स्कूटर बाजारात उपलब्ध आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेली Honda Dio ही अपडेटेड व्हर्जन असून, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 68,846 रुपयांपासून सुरू होते, ज्यामुळे तरुण ग्राहकांमध्ये ती विशेष लोकप्रिय ठरत आहे.
सुजुकी Access 125 ही 125cc सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटरपैकी एक आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या स्कुटरच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. यात 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, ते 6,500 rpm वर 8.3 bhp पॉवर आणि 5,000 rpm वर 10.2 Nm टॉर्क निर्माण करते.
2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार
टीव्हीएस कंपनीची Ntorq 125 ही दमदार आणि स्पोर्टी स्कूटर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंतीस उतरत आहे. या स्कुटरची एक्स-शोरूम किंमत 80,900 रुपयांपासून सुरू होते. यात 124.8cc इंजिन देण्यात आले असून, फ्रंट डिस्क ब्रेक, मजबूत फ्रेम आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशी मोठी स्टोरेज स्पेसही उपलब्ध आहे.






