फोटो सौजन्य: Social Media
भारतात नेहमीच बजेट फ्रेंडली बाईक्सना चांगली मागणी मिळते. या बाईक्स उत्तम मायलेज देण्यासाठी ओळखल्या जातात. देशात अनेक अशा कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या आवश्यकता आणि बजेटनुसार बाईक ऑफर करत असतात. Bajaj ही त्यातीलच एक कंपनी आहे.
2024 मध्ये कंपनीने जगातील पहिली CNG बाईक लाँच करत आपली एक वेगळी हवा लाँच केली होती. Bajaj Freedom 125 असे या बाईकचे नाव होते. आता मार्केटमध्ये कंपनीने Bajaj Platina 110 चा नवा व्हेरियंट लाँच केला आहे.
बजाज प्लॅटिना 110 एनएक्सटी भारतात 74,214 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे, जी बेस व्हेरियंट प्लॅटिना 110 पेक्षा 2,656 रुपये जास्त आहे, ज्याची किंमत 71,558 रुपये आहे.
2025 Yezdi Adventure भारतात लवकरच होणार लाँच, नव्या फीचर्ससह मिळणार नवीन डिझाइन
दोन्ही व्हेरियंटचे डिझाइन सारखेच आहे, परंतु नवीन व्हेरियंट वेगळा आणि अधिक स्टायलिश दिसावा यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. प्लॅटिना 110 NXT मध्ये हेडलाईटभोवती क्रोम बेझल, बॉडी पॅनल्सवर नवीन ग्राफिक्स आणि हेडलाईट काऊल आहे. या व्हेरियंटमध्ये थोडा स्पोर्टी लूकसाठी रिम डेकल्ससह ब्लॅक आउट अलॉय व्हील्स देखील आहेत. हे रेड-ब्लॅक, सिल्व्हर-ब्लॅक आणि येल्लो-ब्लॅक कलरस्कीमसह आणले गेले आहे.
बेस व्हेरियंटबद्दल बोलायचे झाले तर, त्यात काळ्या रंगाचे अलॉय आहेत, ज्यामध्ये वेगवेगळे रिम स्टिकर्स दिले आहेत. रायडरच्या सुरक्षेसाठी बेस व्हेरियंटमध्ये नकल गार्ड्स देखील आहेत. बेस व्हेरियंट इबोनी ब्लॅक ब्लू, इबोनी ब्लॅक रेड रंगांमध्ये उपलब्ध आहे.
बजाज प्लॅटिना 110 एनएक्सटीला अपडेटेड इंजिन मिळाले आहे, जे आता लेटेस्ट उत्सर्जन नियमांची पूर्तता करण्यासाठी ओबीडी-२बी अनुरूप आहे. नवीन व्हेरियंटमधील इलेक्ट्रॉनिक कार्बोरेटर आता FI (फ्युएल इंजेक्शन) सिस्टम ने बदलण्यात आला आहे. हे अपडेट लवकरच बेस व्हेरियंटमध्ये देखील दिले जाऊ शकते. दोन्ही व्हेरियंटमध्ये समान 115.45 सीसी, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 8.5 पीएस पॉवर आणि 9.81 एनएम टॉर्क निर्माण करते. त्याचे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
TVS Ntorq 150 भारतात लवकरच होणार लाँच, मिळणार एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स
फीचर्स
नवीन प्लॅटिना 110 एनएक्सटीमध्ये अॅनालॉग स्पीडोमीटर आणि अॅनालॉग फ्युएल गेजसह इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, तसेच टेल-टेल लाईट्स देखील आहेत, जे बेस व्हेरियंटमध्ये देखील उपलब्ध आहेत. नवीन व्हेरियंट कन्सोलच्या अगदी वर एक USB चार्जिंग पोर्ट आहे. दोन्ही व्हेरियंटमध्ये समान हॅलोजन हेडलाइट (एलईडी डीआरएलसह), टेल लाईट आणि इंडिकेटर्स आहेत. बेस व्हेरियंटच्या तुलनेत, NXT व्हेरियंटमध्ये अधिक आरामदायी कुशनिंग सीट आहे.
दोन्ही व्हेरियंटमध्ये 17-इंच ब्लॅक-आउट अलॉय व्हील्स, टेलिस्कोपिक फोर्क्स आणि गॅस-चार्ज्ड 5-स्टेप प्रीलोड-अॅडजस्टेबल ट्विन रिअर शॉक अॅब्झॉर्बर्ससह अंडरपिनिंग्स दिले आहेत. दोन्हीमध्ये CBS (कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम) सह 130 मिमी फ्रंट आणि 110 मिमी रियर ड्रम ब्रेक दिले आहेत.