फोटो सौजन्य: iStock
भारतीय ग्राहक जेव्हा बाईक खरेदी करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांचे लक्ष बाईकची किंमत आणि मायलेज यावर असते. मार्केटमध्ये कमी किमतीत जास्त मायलेज देणाऱ्या बाईकची मागणी अधिक असते. ग्राहकांची ही आवश्यकता ओळखून अनेक ऑटो कंपन्या बेस्ट बजेट फ्रेंडली बाईक्स ऑफर करत आहेत, ज्यांचा वापर रोजच्या जीवनात सहज करता येतो. या बाईक जास्त इंधन कार्यक्षमतेसह, आरामदायक आणि टिकाऊ असतात. विविध ब्रँड्स कमी किंमतीत उत्तम बाईक ऑफर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बाईक खरेदी करताना भारतीय ग्राहकांचे लक्ष मुख्यतः बजेट आणि मायलेजवर केंद्रित असते.
भारतीय बाजारपेठेत बाईक आणि स्कूटरना मोठी मागणी आहे. यामागील मोठे कारण म्हणजे बाईक आणि स्कूटर हे दोन्ही रोजच्या धावण्यासाठी सर्वोत्तम ठरतात. दुसरे कारण म्हणजे देशात, दुचाकी स्वस्त, हलक्या आणि वाहतुकीचे उत्तम साधन आहेत जे तुम्हाला गर्दीच्या ठिकाणी तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत लवकर पोहोचवू शकतात. त्यात ग्राहक नेहमीच चांगल्या दुचाकीच्या शोधात असतात, जी उत्तम मायलेज देईल.
भारतीय मार्केटमध्ये अशा अनेक दुचाकी उपलब्ध आहेत, ज्या कमी किमतीच्या असून चांगले मायलेज देखील देतात. आता अधिक पर्यायांमुळे, कोणती बाईक खरेदी करणे अधिक फायदेशीर आहे याबद्दल ग्राहकांमध्ये नेहमीच गोंधळ होत असतो. चला काही बेस्ट मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल जाणून घेऊया.
यादीत पहिला क्रमांक हिरो स्प्लेंडर प्लस बाईकचा आहे. ARAI ने दावा केला आहे की या बाईकचे मायलेज प्रति लिटर ७०-८०.६ किलोमीटर आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक नोएडामध्ये ७७,०२६ रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.
दुसरी बाईक बजाज प्लॅटिना 100 आहे. ही बाईक प्रति लिटर 70 किलोमीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. कंपनी ही बाईक 68,890 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीला विकली जाते.
तिसरी बाईक टीव्हीएस रेडियन आहे. कंपनीच्या मते, ही बाईक प्रति लिटर 73.68 किलोमीटर पर्यंत मायलेज देते. नोएडामध्ये या बाईकची एक्स-शोरूम किंमत 69,429 रुपये आहे. या बाईकच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक प्रति लिटर 64 किलोमीटर मायलेज देण्याचा दावा करते.
वाहनचालकांसाठी राज्य सरकारचा दिलासा ! HSRP नंबरप्लेटबाबत घेतला महत्वाचा निर्णय
या यादीतील चौथे नाव बजाज सीटी 110एक्स बाईकचे आहे. ही बाईक 70 किमी पर्यंत मायलेज देऊ शकते आणि 68,328 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.
पाचव्या क्रमांकावर यामाहा रे-झेडआर 125 एफआय हायब्रिड स्कूटर आहे, जी एका लिटरमध्ये 71.33 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. ही बाईक 87,888 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.