फोटो सौजन्य: @autocar (X.com)
पूर्वी कार खरेदी करताना ग्राहक फक्त त्याची किंमत आणि मायलेज या दोनच गोष्टींवर लक्षकेंद्रित करायचे. पण आज ही स्थिती बदलली आहे. आजचा ग्राहक कार खरेदी करताना त्यातील सेफ्टी फीचर्सवर सुद्धा लक्षकेंद्रित करत असतो. त्यामुळेच तर आता अनेक ऑटो कंपन्यांची कार उत्पादित करताना आधुनिक फीचर्स सोबतच सेफ्टी फीचर्स समाविष्ट करण्यावर देखील विशेष भर असतो. नुकतेच एका कारची क्रॅश टेस्ट करण्यात आली, ज्यात तिला 5 स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
फेब्रुवारी 2025 मध्ये भारतात लाँच झालेल्या BYD Sealion 7 ने आंतरराष्ट्रीय सेफ्टी टेस्टमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे आणि युरो NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळवले आहे. युरो एनसीएपी (European New Car Assessment Programme) हा युरोपमधील सर्वात विश्वासार्ह क्रॅश टेस्ट प्लॅटफॉर्म आहे, जो कारच्या सेफ्टी परफॉर्मन्सचे बारकाईने परीक्षण करतो. आता या टेस्टिंगमध्ये Sealion 7 ने चमकदार कामगिरी केली आहे.
अरे बापरे ! Kia ला समजण्याच्या आतच ‘या’ प्लांटमधून 900 इंजिनची चोरी, आता पोलिसांकडून चोरट्यांचा शोध
अॅडल्ट सेफ्टी 87%
चाइल्ड सेफ्टी 93%
पादचारी/सायकलस्वार) 76%
सेफ्टी असिस्ट फीचर्स 79%
अॅडल्टच्या सुरक्षेबद्दल बोलायचे झाले तर, फ्रंटल ऑफसेट क्रॅश टेस्टमध्ये या कारची बॉडी स्थिर आणि मजबूत असल्याचे आढळून आले. ड्रायव्हर आणि समोरील प्रवाशाच्या गुडघ्या आणि मांड्यांजवळ उत्कृष्ट सुरक्षितता आढळली आहे. साइड बॅरियर आणि पोल इम्पॅक्ट टेस्टिंगमध्ये एसयूव्हीने सर्वाधिक गुण मिळवले. व्हिपलॅश प्रोटेक्शन (मागील बाजूच्या टक्करीत मानेला दुखापत होण्यापासून बचाव) ला देखील चांगले रेटिंग मिळाले आहे.
चाइल्ड सेफ्टीबद्दल बोलायचे झाले तर, या एसयूव्हीला मुलांच्या सुरक्षेसाठी 93% गुण मिळाले. 6 आणि 10 वर्षे वयोगटातील डमी मुलांवरील क्रॅश टेस्टिंगमध्ये उत्कृष्ट संरक्षण दिसून आले. यात ISOFIX माउंट्स आणि ‘Child Presence Detection’ फीचर आहे, जे कारमध्ये एखादे मूल राहिल्यास अलर्ट करते.
फक्त 11 हजारांचे डाउन पेमेंट आणि Royal Enfield Classic 350 होईल तुमची, दरमहा द्यावा लागेल इतकाच EMI?
पादचाऱ्यांना आणि सायकलस्वारांनाही चांगले संरक्षण देण्यात आले आहे. त्यात AEB सिस्टीम (ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग) देण्यात आली आहे. यामध्ये, विंडशील्ड पिलर्सजवळील डोक्याचे संरक्षण थोडे कमकुवत असल्याचे आढळून आले. याशिवाय, ‘सायकलिस्ट डोअरिंग प्रिव्हेन्शन’ मध्येही थोडीशी सुधारणा व्हावी असे जाणवले.
BYD Sealion 7 ही भारतात 48.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली होती. प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये ही कार टेस्ला मॉडेल वाय, ह्युंदाई आयोनिक 5 आणि किआ EV6 सारख्या कारशी थेट स्पर्धा करते.