पावसाळ्यात गाडी चालवणे म्हणजे अगदी जिकीरीचे काम असते. रस्ते निसरडे होणे, पाणी साचणे आणि पावसामुळे कमी दिसणे यांमुळे अपघातांचा धोका प्रचंड वाढतो. अशा वेळी आपली कार सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या अॅक्सेसरीज स्वतः बरोबर वापरणे गरजेचे आहे. या काही कार साठी १० आवश्यक साधनांची यादी खाली दिली आहे.
कारसाठी १० महत्त्वाच्या अॅक्सेसरीज
१. अँटी-फॉगर फिल्म: पावसाळ्यात कारच्या काचांवर फॉग जमा होते. आरसा आणि साईड विंडोवर ही फिल्म लावल्याने मागचे स्पष्ट दिसते.
२. चांगले वायपर ब्लेड्स: पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वायपर. खराब वायपर बदलून सिलिकॉन ब्लेड्स बसवणे हे एक महत्त्वाचे काम पावसाळ्यात करायला हवे.
तुम्हाला कार डिझायनर बनायचं आहे का? हे शिक्षण आणि कौशल्ये तुमच्याकडे असणे गरजेचे आहे! जाणून घ्या
३. वॉटर रिपेलेंट स्प्रे: हा स्प्रे विंडशील्डवर (समोरच्या काचेवर) मारल्याने पाण्याचे थेंब काचेवर न थांबता लगेच वाहून जातात.
४. ऑल-वेदर फ्लोअर मॅट्स: रबर किंवा ७D मॅट्स कारची ओलसरपणा आणि चिखलापासून संरक्षण करतात, ज्यामुळे गाडीत दुर्गंधी येत नाही आणि चिखलही गाडीत लागत नाही.
५. वॉटरप्रूफ कार कव्हर: कार उघड्यावर पार्क करावी लागत असेल, तर चांगल्या दर्जाचे वॉटरप्रूफ कव्हर असणे अगदी आवश्यक आहे.
६. मड फ्लॅप्स: चाकांमागे मड फ्लॅप्स बसवल्याने चिखल आणि पाणी कारच्या बॉडीवर आणि मागच्या गाड्यांवर उडत नाही.
‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
७. कार व्हेंटिलेटर: गाडीतील ह्युमिडीटी आणि ओलसर हवेचा वास कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
८. इन्फ्लेटेबल टायर इन्फलेटर: पावसाळ्यात पंक्चरचे दुकान मिळणे कठीण असते. अशा वेळी पोर्टेबल एअर पंप खूप मदतीचा ठरतो.
९. विंडशील्ड वॉशर फ्लुइड: काचेवरील चिखल आणि तेलकटपणा साफ करण्यासाठी वॉशर टँकमध्ये चांगल्या दर्जाचे फ्लुइड वापरावे.
१०. इमर्जन्सी टूल किट: यामध्ये सीटबेल्ट कटर, ग्लास ब्रेकर आणि टोईंग दोरी असावी.
या अॅक्सेसरीजचा वापर करून तुम्ही तुमचा पावसाळी प्रवास अगदी बिनधास्तपणे सुरक्षित आणि सुखकर करू शकता.






