Car Safety Alert : सावधान! 'या' स्टायलिश अॅक्सेसरीज आजच फेकून द्या; नाहीतर अपघातात तुमची सुरक्षाच बनेल शत्रू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Royal Enfield चा नवा धमाका! लॉंच केलं खास स्टायलिश Heritage Collection, पाहून म्हणाल नादच खुळा
कारमधील सर्वात धोकादायक ॲक्सेसरीज म्हणजे डमी सीट बेल्ट बकल्स. अनेकदा लोक सीटबेल्ट लावावा लागू नये आणि त्याच्या इशारा देणारे बीप साऊंड बंद करण्यासाठी याचा वापर करतात. पण ही चूक सर्वात घातक ठरु शकते. सीटबेल्ट केवळ नियमांसाठी नसून तुमच्या सुरक्षेसाठी आहे. अपघाताच्या वेळी एअरबॅग्स उघडली नाही तर सीटबेल्टमुळे तुमचा जीव वाचू शकतो.
गाडीच्या सीट्स स्वच्छ राहण्यासाठी लोक सीट कव्हर्स लावतात. पण सध्याच्या डिजिटल गाड्यांच्या साईड एअरबॅग्स सीटच्या आत बसवलेल्या असतात. जर चुकीच्या आणि घट्ट डिझाइनचे कव्हर लावल्यास अपघाताच्या वेळी एअरबॅग्स बाहेर येणार नाहीत. यामुळे कारला सुरक्षा असूनही त्याचा उपयोग होणार नाही.
अनेक लोक आपली एसयुव्ही उंच दिसावी यासाठी लिफ्ट कीट बसवतात. पण यामुळे गाडीचे संतुलन बिघडते. वळणावर किंवा अचानक ब्रेक मारल्यावर गाडी उलटून मोठा अपघात होऊ शकतो.
तसेच कारच्या पुढच्या बाजूला लोखंडी बुल बार किंवा गार्ड लावणे देखील तुमच्या सुरक्षेसाठी घातक ठरु शकते. यामुळे कारमधील सेन्सर काम करणे बंद होईल आणि परिणामी वेळेवर एअरबॅग्स उघडणार नाहीत. याशिवाय पादचाऱ्याशी टक्क झाल्यास समोरच्या व्यक्तीसाठी ते घातक ठरु शकतात.
तुमच्या कारमध्ये या ॲक्सेसरीज इन्स्टॉल केले असतील तर वेळेतच काढून टाका. जेणेकरु गाडीसोबत तुम्हीही सुरक्षित राहाल. कोणताही बदल करण्यापूर्वी सुरक्षेच्या सर्व निकषांचा विचार करा. अन्यथा तुमची एक चूक मृत्यूला आमंत्रण ठरु शकते.
Car Driving Tips : घाटात गाडी चालवताय? सावधान, ‘हे’ नियम पाळले नाहीत, तर यमराजही वाचवू शकणार नाही






