नेहमी कार चालवत असूनही बरेच लोक इंजिन ऑईलच्या कॉलिटी वरती लक्ष देत नाहीत आणि बनावटी किंवा खराब ऑईल वापरतात. यामुळे इंजिनाची काम करण्याची शक्ती खराब होते. बरोबरच पुढे जाऊन मोठा खर्च त्याच्या दुरुस्ती साठी करावा लागतो. आजकाल बाजारात या बनावटी नकली, ऑईलचा व्यापार बोकाळलाय. अशा ऑईलमध्ये आवश्यक केमिकल्स आणि गोष्टी नसल्याने, इंजिनाची सुरक्षा तर होतच नाही उलट इंजिनाच्या आयुष्याला धोका निर्माण होतो.
हळूहळू इंजिनाचे पार्टस खराब व्हायला सुरुवात होते, मायलेजही कमी होतं आणि बऱ्याचदा इंजिन बंद पडण्याचीही वेळ येते. अशात जर तुम्हालाही, तुमच्या कारसाठी वापरणारे ऑईल चांगले आहे कि खराब याची ओळख करावयाची असेल तर, या तीन पद्धतीनी ते होऊ शकते.
१.ऑईलचा रंग आणि घट्टपणा
इंजिन ऑईलची कॉलिटी ओळखण्याचा सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे त्याचा रंग आणि टेक्स्चर बघणं. नवीन आणि चांगलं इंजिन ऑईल हलक्या सोनेरी रंगाचं आणि स्वच्छ असतं. याउलट ऑईल जर जास्त काळ्या रंगाचं, जास्त घट्ट दिसत असेल, शिवाय त्यात कचरा,घाण दिसत असेल तर ते ऑईल खराब झालेलं असतं. बऱ्याचदा बनावटी ऑईलमध्ये पाण्यासारखी भेसळ दिसते, जी इंजिनसाठी धोकादायक असते. जर ऑईल मधून जळल्यासारखा वास येत असेल, तर समजून जायला हवे कि ऑईल खराब आहे. ऑईलचे जास्त काळे दिसणे, त्यात मातीचे कण असणे, शिवाय त्यातून जळल्याचा वास येणे हे खराब ऑईलचे संकेत आहेत.
२. पॅकेजिंग आणि सीलला लक्ष देऊन पाहा
बनावटी इंजिन ऑईलची ओळख त्याच्या पॅकेजिंगवरूनही केली जाउं शकते. खऱ्या आणि चांगल्या कंपनींच्या ऑईलची पॅकेजिंग नीटनेटकी आणि प्रोफेशनल असते. तेच बनावटी ऑईलच्या बॉटलवर बऱ्याच छोट्या छोट्या चुका आढळतात. जर बॉटल वरची प्रिंटींग धूसर असेल, स्पेलिंग चुकीची असेल किंवा लोगो तिरका वगैरे दिसत असेल तर अशा ऑईलला खरेदी करण्यापासून सावधान राहिले पाहिजे. आजकाल बहुतेक मोठ्या कंपन्या QR कोड आणि बॅच नंबर देतात, ज्याच्यामुळे त्याची ओळख करता येईल. जर हा नंबर गायब असेल किंवा ओळखता येत नसेल तर ऑईल बनावटी आहे हे ओळखून जायला पाहिजे.
३. कारचा परफॉर्मन्स
जर तुमची कार पहिल्यापेक्षा कमी परफॉर्मन्स देत असेल तर सामुजून जावं कि हा खराब इंजिन ऑईलचा संकेत आहे. खराब किंवा जुनं ऑईल इंजिनाला नीट लुब्रिकेट करू शकत नाही, ज्यामुळे बऱ्याच अडचणी गाडीला सहन कराव्या लागतात. उदाहरण म्हणजे इंजिनातून खट-खट किंवा टिक-टिक असा आवाज येत असेल तर याचा अर्थ ऑईल नीट काम करत नाही. असं तेव्हा होतं जेव्हा इंजिनांच्या पार्टसमध्ये जास्त घर्षण होतं. याशिवाय जुनं खराब इंजिन ऑईल इंजिनाची उष्णता कमी करू शकत नाही. यामुळे ओव्हरहिटिंगची समस्या उत्पन्न होते आणि मायलेजही कमी व्हायला सुरुवात होते. जास्त घर्षण झाल्यामुळे इंजिनाला जास्त मेहनत करावी लागते आणि त्यामुळं जास्त इंधनाची खपत होते. कारचं पिकअपकमी होणं, गाडी जड वाटणं किंवा सारखं सारखं गाडीचं थांबणं हे खराब ऑईल मुळे होऊ शकत.






