SUV प्रेमींसाठी या वर्षीची दिवाळी खूप खास असणार आहे. या वर्षीच्या दिवाळी सीजनमध्ये बरेच मोठे दिग्गज ऑटोमेकर आपल्या नवीन SUV लाँच करणार आहेत. यामध्ये टाटा सिएरा इव्हीच्या बरोबर दोन नवीन प्लग-इन हायब्रीडही समाविष्ट आहेत. कमालीच्या सुविधांबरोबर तुम्हाला दमदार रोड प्रेजेंसही या SUV मधून मिळणार. चला येणाऱ्या या SUV बद्दल जाणून घेऊयात विस्ताराने.
टाटा सिएरा ईव्ही
टाटा मोटर्सने ओफिशीअली हे जाहीर केलेलं आहे कि सिएरा ईव्ही ही 2027 आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात लाँच होईल. ही कार एक्टी.इव्ही या प्लॅटफॉर्मवर आधारित असे. हा तोच प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर टाटा कर्व इव्हीही बनली आहे. ही इलेक्ट्रिक SUV ह्युंडाई क्रेटा इलेक्ट्रिक, मारुती सुझुकी, ई विटारा आणि अशा सेगमेंटच्या कारना टक्कर देण्याची शक्यता आहे. टाटा सिएरा ईव्ही दोन बॅटरी पर्यायांबरोबर येतेय. यात 55KWh आणि 65 KWhच्या बॅटरी आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर याची रियर रेंज जवळजवळ 500 किमी पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.
जेटूर T2
JSW मोटर्स भारतात एक स्वायत्त ऑटोमोटिव ब्रॅंड म्हणून सुरुवात करणार आहेत. यासाठी ते जेटूर T2 वर आधारित प्लग-इन हायब्रीड SUV लाँच करणार आहेत. याची एन्ट्री 2026 च्या दिवाळीत होऊ शकते. या नवीन SUVचं भारतीय बाजारात एक वेगळंच नाव होणार आहे. या प्लग-इन हायब्रीड SUV ला ब्रॅंडच्या छत्रपती संभाजीनगरच्या ग्रीनफिल्ड मेन्यूफॅक्चरिंग प्लांट मध्ये तयार करण्यात येणार आहे. या SUV ची लांबी 4785 मिमी, रुंदी 2006 मिमी तर उंची 1875 मिमी आहे, आणि याचा व्हीलबेस 2800 मिमी आहे.
जेटूर T2 मध्ये टर्बो पेट्रोल iDM प्लग इन हायब्रीड इंजिन लावलेलं आहे, ज्यात 26.7 Kwh ची बॅटरी आणि ड्यूअल मोटर AWD सेटअप आहे. 3 स्पीड DHT चे याचे इंजिन 375 BHP ची एकत्र पावर आणि 610 NM चा टोर्क देतं.
एमजी स्टारलाइट 560
MG भारतीय बाजारात स्टारलाईट 560 प्लग इन हायब्रीड वाहन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. वूलिंग स्टारलाईट 560 वर आधारित या PHEVला भारतात बऱ्याचदा तेस्तीन्गच्या दरम्यान दाखवलं गेलं आहे. MG महिंद्रा XEV 9S आणि येणाऱ्या टाटा सफारीला टक्कर देण्यासाठी स्टारलाईट 560SUVचा EV वर्जनही लाँच करण्याच्या विचारात आहेत. स्टार लाईट 560 PHEV एकत्र रेंज 1100 किमीपेक्षा जास्त आहे. शहरातल्या ट्राफिकसाठी यात इलेक्ट्रिक- ओन्ली सिस्टम आहे.
यात 1.5 लीटरचापेट्रोल इंजिन पावरफुल इलेक्ट्रिक मोटारच्या बरोबर दिलेला आहे. बरोबरच याच्यात 20.5 KWh LFP बॅटरी पॅक आहे आणि हा 125 किमी पूर्ण इलेक्ट्रिक रेंग देतेय असं सांगितलं जातंय.






