फोटो सौजन्य: @GaadiKey(X.com)
अमेरिकन ऑटोमेकर Jeep भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये एसयूव्ही विकते. कंपनीने अलीकडेच Jeep Wrangler ची Willys 41 एडिशन नावाची एक स्पेशल एडिशन लाँच केले आहे.
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे खूप मोठे असल्याकारणाने विविध देशातील ऑटो कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दमदार कार्स ऑफर करतात. यात बजेट फ्रेंडली कार्सपासून लक्झरी कार्सचा समावेश आहे.
किती पण नवीन कार येऊ द्यात ! ‘या’ 5 SUVs शिवाय ग्राहकांना दुसरे काही दिसतच नाही
भारतात अनेक विदेशी ऑटो कंपन्या आहेत. यातीलच एक मोठे नाव म्हणजे जीप. ही अमेरिकन ऑटो कंपनीने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी जीप भारतात विविध सेगमेंटमध्ये एसयूव्ही विकते. कंपनीने प्रीमियम एसयूव्ही म्हणून ऑफर केलेली Jeep Wrangler, Willys 41 एडिशनसह लाँच करण्यात आली आहे. या व्हर्जनमध्ये कोणते बदल केले आहेत? कोणत्या खास फीचर्ससह ही कार लाँच करण्यात आली आहे? ही किती किमतीला खरेदी करता येईल? यासर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
जीप रँग्लरला विलीज 41 एडिशनसह भारतीय मार्केटमध्ये अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या कारमध्ये फक्त कॉस्मेटिक बदल केले आहेत. यांच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाही.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवीन व्हर्जन फक्त रँग्लर एसयूव्हीच्या टॉप व्हेरियंटमध्येच दिली जात आहे. जी 1941 च्या मूळ विली जीपपासून प्रेरणा घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या व्हर्जनच्या फक्त 30 युनिट्स ऑफर केल्या जातील.
Jeep Wrangler Rubicon च्या Willys 41 Edition ला 41 हिरव्या पेंटमध्ये बदलू शकता जे जुन्या मिलिटरी जीपसारखे दिसेल. याशिवाय, त्यात इतर अनेक कलर ऑप्शन देखील दिले आहेत. एसयूव्हीच्या नवीन व्हर्जनमध्ये हुडवर एक डेकल आहे. याशिवाय, एंट्री आणि बाहेर पडण्यासाठी पॉवर साईड स्टेप्स देखील देण्यात आल्या आहेत.
वर्षोनुवर्षे अगदी मक्खनसारखी स्मूद धावेल कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ 5 टिप्स
या एसयूव्हीमध्ये पुढील आणि मागील डॅशकॅम देखील आहे आणि सर्व हवामानात वापरता येणारे फ्लोअर मॅट्स देखील दिले आहेत. नवीन व्हर्जनसह, जीप पर्यायी अॅक्सेसरीज देखील देत आहे ज्यात साइड लॅडर, रूफ कॅरियर, सनरायडर रूफटॉप यांचा समावेश आहे. या पर्यायी अॅक्सेसरीजसाठी अतिरिक्त 4.56 लाख रुपये द्यावे लागतील.
जीपने या एसयूव्हीच्या विली 41 एडिशनची एक्स-शोरूम किंमत 73.16 लाख रुपये ठेवली आहे. जीप रँग्लर रुबिकॉनच्या एक्स-शोरूम किमतीपेक्षा ही किंमत 1.51 लाख रुपये जास्त आहे.