फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार असणे ही भावनाच खूप सुख देणारी असते. म्हणूनच तर काही जण दिवसरात्र मेहनत करून पैशांची बचत करत असतात, जेणेकरून ते आपली ड्रीम कार खरेदी करू शकतील. त्यात आता मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सना दमदार मागणी मिळते. जर तुम्ही ऑफिस किंवा शहरातील दैनंदिन प्रवासासाठी परवडणारी आणि स्मार्ट इलेक्ट्रिक कार शोधत असाल, तर MG Comet EV तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.
ही कार सध्या भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.35 लाख रुपये आहे. दिल्लीमध्ये एक्झिक्युटिव्ह व्हेरियंटची ऑन-रोड किंमत सुमारे 7.75 लाख रुपये आहे, ज्यामध्ये विमा, आरटीओ आणि इतर चार्जेस समाविष्ट आहेत. एमजी कॉमेट ईव्हीचा बेस व्हेरियंट खरेदी करण्यासाठी, जर तुमचा महिन्याचा पगार 30,000 रुपये असेल, तर तुम्ही 1 लाख रुपयांचे डाउन-पेमेंट देऊन ही कार घरी आणू शकता.
‘या’ भारतीय ऑटो कंपनीने इतिहास घडवला ! एका वर्षात 10 लाख बाईक्स विकत गाजवलं मार्केट
EMI कॅल्क्युलेशननुसार, उर्वरित रक्कमेसाठी रु. 6.75 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी, जर बँक 5 वर्षांच्या (६० महिने) कालावधीसाठी 9% व्याजदराने कर्ज देते, तर तुम्हाला सुमारे रु. 14,000 चा ईएमआय भरावा लागेल. या कालावधीत, एकूण व्याज म्हणून अंदाजे 1.65 लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. परंतु, हे कॅल्क्युलेशन बँकेच्या अटी आणि शर्ती, तुमचा CIBIL स्कोअर आणि डीलरशिपच्या फायनान्सिंग पॉलिसीवर अवलंबून असते, त्यामुळे EMI रक्कम थोडीशी बदलू शकते.
एमजी कॉमेट ईव्हीच्या बॅटरी, मोटर आणि रेंजबाबत सांगायचे झाल्यास, यामध्ये 17.3 किलोवॅट-तास क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. ही बॅटरी सिंगल मोटर सेटअपसह 41.42 बीएचपी पॉवर आणि 110 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 230 किमीची ARAI प्रमाणित रेंज देते, जी शहरात दररोजच्या वापरासाठी पुरेशी आहे.
कॉमेट ईव्हीमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. 3.3 किलोवॅट एसी चार्जरच्या साहाय्याने 0 ते 100% चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तास लागतात.
प्रीमियम आणि अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या ‘या’ कारवर मिळतंय 2.70 लाखांचे डिस्काउंट
सुरक्षेच्या बाबतीत एमजी कॉमेट ईव्हीमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS आणि EBD, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा यांचा समावेश आहे, जे कारच्या सुरक्षिततेला अधिक उत्तम बनवतात.