Kia Carens Clavis भारतात लाँच, अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असणार कार
दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी कियाने देशात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने नवीन MPV Kia Carens Clavis ही औपचारिकपणे सादर केली आहे. या कारमधील ‘क्लॅव्हिस’ नाव लॅटिन वाक्य क्लॅव्हिस ऑरियामधून घेण्यात आले आहे, ज्याचा अर्थ ‘गोल्डन की’ असा होतो. या नवीन कारमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? या MPV मध्ये किती पॉवरफुल इंजिन उपलब्ध असेल? त्याच्या किमती कधीपर्यंत जाहीर केल्या जाऊ शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
किआ मोटर्सने नवीन एमपीव्ही किआ कॅरेन्स क्लॅव्हिस अधिकृतपणे सादर केली आहे. यासोबतच, MPV चे फीचर्स, इंजिन आणि इतर माहिती देखील देण्यात आली आहे. या कारला कियाच्या नवीन 2.0 डिझाइनसह ऑफर करण्यात आले आहे. कंपनीकडून या कारच्या डिझाइन सारखेच EV9, Syros सारख्या कार देखील ऑफर केल्या जात आहेत.
फक्त 2 लाखात मिळेल ‘ही’ स्वस्त ७ सीटर कार, असा असेल संपूर्ण EMI चा हिशोब
Kia Carens Clavis मध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात एलईडी डीआरएल, एलईडी आइस क्यूब हेडलाइट्स, कनेक्टेड एलईडी टेल लॅम्प, पॅनोरॅमिक सनरूफ, 26.62 इंच ड्युअल स्क्रीन, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, 64 रंगीत अँबियंट लाईट्स, 360 डिग्री कॅमेरा, एअर प्युरिफायर, बोस ऑडिओ सिस्टम, वायरलेस फोन चार्जर, दोन स्पोक स्टीअरिंग व्हील, ड्युअल टोन इंटीरियर, ब्लॅक साइड डोअर गार्निश, 17 इंच अलॉय व्हील्स, पुश बटण स्टार्ट/स्टॉप, दुसऱ्या रांगेतील कॅप्टन सीट्स, अशी फीचर्स आहेत.
किया कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही खूप लक्ष देण्यात आले आहे. त्यात अनेक सेफ्टी फीचर्स स्टॅंडर्ड म्हणून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज, ESC, ABS, EBD, हिल असिस्ट, पार्किंग सेन्सर, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, VSM, BAS, HAC यांचा समावेश आहे. यासोबतच, त्यात 20 सेफ्टी फीचर्ससह लेव्हल-2 ADAS देखील समाविष्ट आहे.
Operation Sindoor नंतर जर भारत-पाकिस्तानात युद्ध झालेच तर लष्करासाठी खूप फायद्याची ठरेल ‘ही’ कार
किआ कॅरेन्स क्लॅव्हिस नुकतीच सादर करण्यात आली आहे. या कारसाठीची बुकिंग मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल. काही काळानंतर या कारच्या किमती जाहीर केल्या जातील. याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 15 लाख रुपये असू शकते.
किया कडून एमपीव्ही सेगमेंटमध्ये कॅरेन्स क्लॅव्हिस ऑफर केली जात आहे. या सेगमेंटमध्ये ही कार JSW MG Hector, Mahindra Scorpio N, XUV 700, Tata Safari, Toyota Innova Crysta सारख्या MPV आणि SUV शी स्पर्धा करेल.