फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या फक्त देशात नाही तर विदेशात सुद्धा लोकप्रिय आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Suzuki. कंपनीने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. ऑफ रोडींगसाठी तर कंपनीची Jimny कार मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहे. नुकतेच ही कार नवीन फीचर्ससह अपडेट झाली आहे.
Suzuki Jimny चा इतिहास जवळपास 50 वर्षांपूर्वीचा आहे. ही कार प्रथम 1970 साली LJ10 नावाने लाँच करण्यात आली होती. त्या वेळी ती एक लहान, हलकी आणि 4×4 ड्राइव्ह असलेली ऑफ-रोड कार होती, ज्यामध्ये 359cc टू-स्ट्रोक इंजिन देण्यात आले होते. ही जपानमधील पहिली मोठ्या प्रमाणावर तयार झालेली मिनी ऑफ-रोड कार होती, ज्याने आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे लोकांचे लक्ष वेधले होते.
Honda SP 125 की Bajaj Pulsar, Diwali 2025 मध्ये कोणती बाईक झाली सर्वात जास्त स्वस्त?
Suzuki ने आता आपल्या 3-डोअर Jimny मॉडेलमध्ये काही हलके अपडेट्स केले आहेत. या कारचा क्लासिक बॉक्सी लुक जसाच्या तसा ठेवण्यात आला आहे, कारण तोच तिचा ओळखीचा भाग आहे. या वेळी कंपनीने Jimny ला अधिक मॉडर्न आणि टेक-फ्रेंडली बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जपानमध्ये उपलब्ध असलेल्या Narrow-body Kei वर्जन आणि रेग्युलर वर्जनचा आकार पूर्वीप्रमाणेच आहे. Kei वर्जनमध्ये रुंद फेंडर नाहीत, पण ब्लाइंड स्पॉट कमी करण्यासाठी आता मिररखाली लहान सब-मिरर दिले आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग आणखी सोपी झाली आहे.
नव्या Jimny च्या इंटिरिअरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. याच्या ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये आता 4.2-इंच कलर डिस्प्ले देण्यात आला आहे, जो रिअल-टाइम ड्रायव्हिंग माहिती दाखवतो. हाय ट्रिम व्हेरिएंटमध्ये आता 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अधिक जलद, यूजर-फ्रेंडली आणि कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह येते. लोअर व्हेरिएंटमध्ये जुने डॅशबोर्ड डिझाइन ठेवले आहे, परंतु बिल्ड क्वालिटीमध्ये सुधारणा केली आहे. या सर्व अपडेट्समुळे Jimny चे केबिन आता अधिक लक्झरी, मॉडर्न आणि यूथफुल वाटते.
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Toyota Hyryder ची चावी डायरेक्ट तुमच्या खिश्यात! EMI फक्त…
Suzuki ने नव्या Jimny मध्ये सेफ्टी फीचर्स अधिक मजबूत केले आहेत. आता यात Dual Sensor Brake Support 2, Lane Departure Prevention, Automatic High Beam Assist, आणि Road Sign Recognition System असे आधुनिक फीचर्स मिळतात. तर ऑटोमॅटिक वर्जनमध्ये आता Adaptive Cruise Control आणि Rear False Start Prevention फीचर्स जोडले गेले आहेत, जे लांब प्रवासात आणि ट्रॅफिकमध्ये ड्रायव्हरची सुरक्षितता अधिक वाढवतात.
अपडेटेड Suzuki Jimny 2025 आता जपानमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Narrow-body Kei व्हर्जनची सुरुवातीची किंमत सुमारे ¥1,918,400 (₹11.18 लाख) आहे, तर Jimny Sierra ची किंमत ¥2,385,900 (₹13.91 लाख) ठेवण्यात आली आहे.