Mahindra XUV 3XO घरी आणायची आहे? 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावी लागेल EMI, जाणून घ्या
TATA चा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत नवी Tiago Facelift लाँच, फीचर्स वाचून व्हाल थक्क
वाहन निर्माता महिंद्रा XUV 3XO चे ऑटोमॅटिक व्हेरिअंट म्हणून MX2 Pro सादर करते. या गाडीच्या ऑटोमॅटिक व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 9.93 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला सुमारे 69 हजार रुपये आरटीओ आणि सुमारे 49 हजार रुपये इंश्योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. यानंतर Mahindra XUV 3XO च्या बेस व्हेरिअंटची ऑन रोड किंमत सुमारे 11.12 लाख रुपये होणार आहे. (फोटो सौजन्य – Mahindra)
जर तुम्ही या गाडीचे ऑटोमॅटिक व्हेरिअंट MX2 Pro खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँक तुम्हाला गाडीच्या एक्स शोरुम किंमतीवर कर्ज देणार आहे. दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 9.12 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागणार आहे. जर बँकेने तुम्हाला 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 9.12 लाख रुपयांचे कर्ज दिले तर तुम्हाला दर महिन्याला 14679 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.
जर तुम्ही 9 टक्के व्याजाने बँकेकडून 7 वर्षांसाठी 9.12 लाख रुपयांचे कार लोन घेतलं तर तुम्हाला सात वर्षांपर्यंत दर महिन्याला 14679 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे, सात वर्षांत, तुम्हाला महिंद्रा XUV 3XO च्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी व्याजापोटी अंदाजे 3.20 लाख रुपये भरावे लागतील. त्यानंतर एक्स शोरूम, ऑन रोड आणि वायज मिळून तुमच्या गाडीची एकूण किंमत 14.33 लाख रुपये होणार आहे.
XUV 3XO ही उत्पादकाकडून एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून सादर केली जाते. ही महिंद्रा एसयूव्ही रेनॉ कायगर, मारुती ब्रीझा, टाटा नेक्सॉन, किया सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू आणि निसान मॅग्नाइट यांसारख्या एसयूव्हींशी थेट स्पर्धा करते.






