फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Mumbai University CDOE Distance Admission 2026: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रता धारकांना थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. शिकण्याची लवचिकता, परवडणारे शिक्षण, शुल्क, युजीसी आणि एआयसीटी मान्यताप्राप्त अभ्यासक्रम हे सीडीओईची वैशिष्ये आहेत. येथे पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक धोरणानुसार राबवली जात आहे.
येथे बी.ए, बी.कॉम, बी.एससी तसेच एम.ए, एम.कॉम आणि एम.एससी अंतर्गत विविध विषयांच्या अभ्यासक्रमांचा पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर समावेश केला आहे.
याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट व डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. या सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेशही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबवले जात आहे. तसेच दुहेरी पदवीचा पर्यायही दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी! आता MBBS पूर्ण करण्यासाठी मिळणार १० वर्षे; NMC चा ऐतिहासिक निर्णय!
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेत स्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधित सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in यासंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सीडीओईमार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी तज्ञ व अनुभवी पूर्णवेळ प्राध्यापक या संस्थेत उपलब्ध आहेत.
ज्या विद्यर्थ्यांना काही अडचणींमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण हे औपचारिक शिक्षण पद्धतीतून पूर्ण करता येत नाही, त्याच्यासाठी विद्यापीठामार्फत चालवला जाणारा हा अभ्यासक्रम शिक्षण पूर्ण करण्यासाठी सोयीस्कर ठरेल. या विद्यापीठाची विभागीय केंद्रे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी, सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून नुकतेच पालघर येथे विभागीय केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते.
RRB Result: टेक्निशियन ग्रेड ३ परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी आणि कटऑफ ‘असा’ करा चेक!






