फोटो सौजन्य: www.hyundai.com
भारतीय बाजरात अनेक उत्तम ऑटो ब्रँड्स आहेत, जे अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये उत्तम कार ऑफर करत आहे. यात स्वदेशीपासून ते विदेशी ब्रँड्सचा समावेश आहे. यातीलच एक मोठे नाव म्हणजे ह्युंदाई. या कंपनीने भारतात बेस्ट कार ऑफर केल्या होत्या, ज्यामुळे कंपनीच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे.
ह्युंदाईने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही Creta ऑफर करते. जर तुम्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेऊया की 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही कार खरेदी केल्यास दरमहा तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल. पण याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.
वाहनांचे Engine Oil सुद्धा एक्सपायर होते का? वेळेतच घ्या बदलून अन्यथा बसेल हजारोंचा फटका
ह्युंदाई क्रेटाचा बेस व्हेरियंट 11,10,900 रुपये (11.10 लाख रुपये) एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. त्याची ऑन-रोड किंमत (1.18 लाख रुपयांचा आरटीओ आणि 48,401 रुपयांचा विमा समाविष्ट करून) 12,88,973 रुपये (12.88 लाख रुपये) आहे.
जर तुम्ही ह्युंदाई क्रेटाचा बेस व्हेरियंट खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 10,88,973 रुपये (10.88 लाख रुपये) बँक कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही हे कर्ज 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला दरमहा 17,521 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील.
जर तुम्हाला हे कर्ज 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने मिळाले तर तुम्हाला 3.82 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. त्यानंतर, ह्युंदाई क्रेटाच्या बेस व्हेरियंटची किंमत एकूण किंमत (3.82 लाख रुपये व्याजदर आणि 2 लाख रुपये डाउन पेमेंटसह) 16.71 लाख रुपये होईल.
भारतात 4 लाखात मिळणारी कार पाकिस्तानात 23 लाखात मिळतेय, जाणून घ्या Swift, Wagon R ची किंमत
किंमत: या कारची एक्स-शोरूम किंमत 11.11 लाख रुपये ते 20.50 लाख रुपये आहे.
इंजिन ऑप्शन: क्रेटा तीन इंजिन ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे – 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्शन.
मायलेज: ही कार प्रति लिटर पेट्रोलमध्ये 17.4 ते 21.8 किमी आणि डिझेलमध्ये 21.8 किमी पर्यंत मायलेज देते.
फीचर्स: या कारमध्ये मल्टी फंक्शन स्टीअरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल एक्सटिरिअर रिअर व्ह्यू मिरर, टचस्क्रीन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), अलॉय व्हील्स, पॉवर विंडो आणि व्हील कव्हर्स अशी फीचर्स आहेत.
सेफ्टी फीचर्स : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल सारखी सेफ्टी फीचर्स दिली आहेत.