Studds ने आणला महिला-पुरुषांसाठी ढासू हेल्मेट (Photo Credit- X)
Studds चा नवीन Vogue D1 Square हेल्मेट एक्स्ट्रा स्मॉल (XS), स्मॉल (S), मीडियम (M) आणि लार्ज (L) अशा 4 साईजमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही हा हेल्मेट ब्लॅक अँड पेस्टल ब्लू, ब्लॅक, व्हाइट अँड रेड, ब्लॅक अँड पिंक, ब्लॅक अँड रेड, ब्लॅक अँड ग्रे आणि ब्लॅक अँड ब्लू या 6 वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता. हा हेल्मेट तुम्हाला ऑफलाईन दुकाने, स्टड्सच्या खास स्टोअर्समध्ये आणि कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
सुरक्षितता आणि आराम या दोन्ही गोष्टींचा विचार करून Vogue D1 Square हेल्मेट डिझाइन केला आहे. हा हेल्मेट दैनंदिन वापर करणाऱ्या आणि लांबच्या प्रवासाला जाणाऱ्या रायडर्ससाठी अतिशय उपयुक्त आहे.
स्टड्स ॲक्सेसरीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भूषण खुराना म्हणाले की, “स्टड्समध्ये आम्ही नेहमीच आमच्या उत्पादनांना ग्राहकांच्या पसंतीनुसार आणि स्टाईलनुसार डिझाइन करण्याचा प्रयत्न करतो. रायडर्सकडून डिझाइनबद्दल अधिक मागणी होती, त्यामुळे आम्ही आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘वोग’ सिरीजला नवीन रूप दिले आहे. हा हेल्मेट हलका असून, ओपेन फेस आहे. याचे आधुनिक डिझाइन सुरक्षिततेची हमी देते आणि महिला-पुरुष दोघेही तो वापरू शकतात.”






