(फोटो- सोशल मिडिया)
Arihant Academy : अरिहंत अकॅडमी लिमिटेड या एसएससी, आयसीएसई, सीबीएसई, सायन्स आणि कॉमर्स या क्षेत्रांतील मुंबईमधील अग्रगण्य कोचिंग संस्थेने ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचे आपले लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उत्कृष्ट आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे, जिथे करोत्तर नफा ९.११ कोटी रूपयांवर पोहोचला आहे, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२५ मधील ४.४५ कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत वार्षिक आधारावर १०४.८५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा एकूण एकत्रित महसूल आर्थिक वर्ष २०२५ मधील ४२.५२ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २६ मध्ये ५२.५७ टक्क्यांनी वाढून ६४.८७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण नावनोंदणी, नवीन बाजारपेठांमधील विस्तार, करिअर-केंद्रित प्रोग्राम्समधील वैविध्य आणि सातत्यपूर्ण कार्यक्षम कामकाज यांमुळे ही वाढ झाली आहे.
Supreme Court चा निकाल आणि क्रॅश झाला ‘हा’ शेअर, आज तब्बल 16 टक्क्यांनी गडगडले भाव!
आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने ३.३२ कोटी रुपयांचा करोत्तर नफा नोंदवला आहे, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीतील १.७७ कोटी रुपयांच्या तुलनेत त्रैमासिक आधारावर ८७.२८ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत एकूण महसूल १६.११ कोटी रुपये राहिला, ज्यामध्ये तिसऱ्या तिमाहीतील १४.५४ कोटी रुपयांच्या तुलनेत १०.७८ टक्के वाढ झाली. या तिमाही कामगिरीमधून कंपनीचा सातत्यपूर्ण वेग, शैक्षणिक क्षेत्रातील मजबूत मागणी आणि विस्तारणाऱ्या नेटवर्कमधील वाढती क्षमता दिसून येते.
आर्थिक वर्ष २०२६ मधील कामगिरीबाबत मत व्यक्त करत अरिहंत अकॅडमीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिल कपासी म्हणाले: “गेल्या वर्षापासून आमच्या संस्थेमध्ये प्रबळ गती पाहायला मिळत आहे. हे आमच्या विद्यार्थी आणि पालकांचा वाढता विश्वास, त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या विस्तारित शैक्षणिक संधी आणि आमच्या समर्पित प्राध्यापक व ऑपरेशनल टीम्सची अथक मेहनत आणि कटिबद्धता याचेच फळ आहे. या तिमाहीच्या आमच्या निकालांमधून विविध आर्थिक आणि ऑपरेशनल क्षेत्रांतील उत्तम वाढ दिसून येते, तसेच हे निकाल आम्ही गेल्या काही वर्षांत जे मॉडेल उभे केले आहे त्याची विस्तार क्षमता देखील सिद्ध करतात.
आम्ही आमची उपस्थिती वाढवण्यासाठी आणि आमच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी अधिक सखोलपणे जोडले जाण्यासाठी प्रयत्न करत असताना, आमचा दर्जेदार शैक्षणिक निकाल देण्याचा आणि त्याच वेळी शाश्वत पद्धतीने आमचा विस्तार करण्याचा मनसुबा आहे. आमच्या बिझनेस पाईपलाईन आणि नावनोंदणी व्यवस्थेमध्ये दिसून येणारी प्रगती आम्हाला येणाऱ्या तिमाहींसाठी आत्मविश्वास देते. आम्हाला विश्वास आहे की, आमच्या टीमचे सातत्यपूर्ण प्रयत्न, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोन आमच्या दीर्घकालीन विस्ताराच्या प्रवासाला पुढेही पाठबळ देत राहतील.”
आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, अरिहंत अकॅडमीने नाशिक (महाराष्ट्र), अहमदाबाद (गुजरात) आणि राजस्थान येथे धोरणात्मक केंद्रे सुरू करून अनेक शैक्षणिक हबमध्ये आपली उपस्थिती वाढवली. राजस्थानमध्ये दोन नवीन केंद्रे सुरू केल्यामुळे त्या राज्यातील एकूण केंद्रांची संख्या पाच झाली आहे. कंपनीने मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर) मध्ये देखील सात नवीन केंद्रे सुरू करून आपले स्थान अधिक दृढ केले आहे, ज्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे अधिक सुलभ झाले आहे.
या वर्षादरम्यान, अरिहंत अकॅडमीने एनएसई अकॅडमीसोबत सहयोगाने सर्टिफाइड इंटर्नल ऑडिटर (सीआयए) सर्टिफिकेशन कोर्स देखील सुरू केला आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थी आणि व्यावसायिकांना ऑडिटिंग, अनुपालन आणि वित्तीय प्रणालींमध्ये उद्योगासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्रदान करणे हा आहे. या उपक्रमांमधून कंपनीचा विस्तार, शैक्षणिक नाविन्यता आणि करिअर-केंद्रित शिक्षणाच्या संधींवर असणारा सातत्यपूर्ण भर दिसून येतो.






