फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम फीचर्स असणाऱ्या कार लाँच होत आहे. तसेच आताचा भारतीय ग्राहक बेस्ट फीचर्ससोबतच जास्त सेफ्टी असणाऱ्या कारला अधिक प्राधान्य देत आहे. यामुळेच तर आता कंपन्या आपल्या आगामी कारमध्ये अधिकचे सेफ्टी फीचर्स समाविष्ट करत आहे. तसेच काही कंपन्या आपल्या कारचे सेफ्टी टेस्ट देखील करताना दिसतात, ज्यात त्यांना सेफ्टी रेटिंग्स दिल्या जातात.
भारतीय मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत ज्या उत्कृष्ट फीचर्सनी सुसज्ज आहेत. जर तुम्ही कमी बजेटमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग आणि उत्तम फीचर्स असणाऱ्या कार शोधत असाल, तर आज आपण सर्वोत्तम ऑप्शन्सबद्दल जाणून घेणार आहोत. भारतात अशा अनेक परवडणाऱ्या कार आहेत ज्यांना क्रॅश टेस्टिंगमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. सेफ्टीसाठी, या वाहनांमध्ये ADAS तसेच एअरबॅग्ज बसवण्यात आल्या आहेत.
Petrol Vs CNG: आजच्या काळात कोणती कार खरेदी करणे ठरेल बेस्ट डील? किमतीत असेल ‘इतका’ फरक
बाजारात टाटा पंचचे एकूण 31 व्हेरियंट्स आहेत. ही कार पाच रंगांच्या पर्यायांसह येते. टाटाच्या बहुतेक कार क्रॅश टेस्टमध्ये पास झाल्या आहेत. टाटा पंचला ग्लोबल एनसीएपीकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे. या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तसेच, यात इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम देखील देण्यात आला आहे. टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
स्कोडा Kylaq ची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 25 स्टॅंडर्ड सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत. या स्कोडा कारच्या सर्व व्हेरियंट मध्ये 6 एअरबॅग्ज आहेत. कारमध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम देखील देण्यात आली आहे. स्कोडा Kylaq बाजारात सात रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या 5-सीटर कारला Adult आणि मुलांच्या सेफ्टीसाठी 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.
क्रॅश टेस्टिंगमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली मारुती डिझायर ही जपानी ऑटोमेकरची पहिली कार आहे. या कारच्या सर्व मॉडेल्समध्ये 6 एअरबॅग्ज आहेत. यासोबतच कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देखील बसवण्यात आली आहे. ही कार पुढच्या जनरेशनमधील झेड-सिरीज इंजिनने सुसज्ज आहे. ही कार बाजारात सीएनजी मोडमध्ये देखील उपलब्ध आहे. मारुती डिझायरची एक्स-शोरूम किंमत 6.84 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.19 लाख रुपयांपर्यंत जाते.
Volkswagen चे EV सेक्टरमध्ये पाहिले पाऊल ! सादर केली ‘ही’ खास कार, 2027 पर्यंत होईल लाँच
भारत एनसीएपी कडून क्रॅश टेस्टमध्ये महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. ही कार तीन इंजिन पर्यायांसह येते. या कारच्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये 1.2-लिटर टर्बो आणि 1.2-लिटर TGDi चा ऑप्शन आहे. या कारच्या इंजिनमध्ये 1.5 लिटर टर्बो डिझेलचा पर्याय देखील समाविष्ट आहे. ही 5 सीटर कार 16 रंगांमध्ये येते. या महिंद्रा कारमध्ये स्कायरूफ देखील देण्यात आला आहे. महिंद्रा XUV 3XO ची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.56 लाख रुपयांपर्यंत जाते.