Yamaha कडून 'या' दुचाकींवर दमदार डिस्काउंट ऑफर
दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या शुभ मुहूर्तावर अनेक जण नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करत असतात. तसेच दुचाकी उत्पादक कंपन्या सुद्धा त्यांच्या वाहनांवर उत्तम डिस्कॉऊंट देत असतात. नुकतेच देशातील आघाडीची ऑटो कंपनी Yamaha ने सुद्धा खास महाराष्ट्रासाठी स्पेशल दिवाळी फेस्टिव्ह ऑफर्सची घोषणा केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात दिवाळीचा जल्लोष सुरू होत असताना, इंडिया यामाहा मोटरने राज्यातील ग्राहकांसाठी खास “दिवाळी फेस्टिव्ह ऑफर्स 2025” जाहीर केल्या आहेत. या ऑफर्सच्या माध्यमातून यामाहा आपल्या ग्राहकांना नवीन दुचाकी खरेदी करताना बचत, आनंद आणि प्रीमियम अनुभव यांचा संगम देत आहे. यामाहा या सणासुदीच्या काळात त्यांच्या लोकप्रिय मोटरसायकल्स आणि स्कूटर्सवर जीएसटी लाभ, विमा फायदे आणि कॅशबॅक ऑफर्स देत आहे, ज्यामुळे ही दिवाळी खास बनणार आहे.
फक्त शहरात नाही तर गावात सुद्धा ‘या’ Mileage Bikes चा दरारा! किंमत iPhone 15 पेक्षा कमी
यामाहाने जाहीर केलेल्या या ऑफर्सचा उद्देश म्हणजे ग्राहकांना सुरक्षित, स्टायलिश आणि कार्यक्षम राइडिंग अनुभव देतानाच त्यांच्या आर्थिक बचतीलाही प्राधान्य देणे आहे.
R15 V4: जवळपास 15,734 रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि 6,560 रुपयांपर्यंत विमा फायदे. या मॉडेलला तरुण राइडर्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. आकर्षक डिझाइन आणि ट्रॅक-इंस्पायर्ड परफॉर्मन्समुळे ही बाईक खास बनते.
MT-15: 14,964 रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि 6,560 रुपयांपर्यंत विमा फायदे. “द डार्क वॉरियर” म्हणून ओळखली जाणारी ही बाईक उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि स्ट्रीट-स्टाईल डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे.
FZ-S Fi Hybrid: 12,031 रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि 6,501 रुपयांपर्यंत विमा फायदे. मायलेज आणि पॉवरचा उत्तम समतोल राखणारी ही बाईक दैनंदिन वापरासाठी परफेक्ट पर्याय आहे.
Fascino 125 Hybrid: 8,509 रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि 5,401 रुपयांपर्यंत विमा फायदे. आकर्षक रंगसंगती, हायब्रिड तंत्रज्ञान आणि एलईडी फीचर्ससह ही स्कूटर तरुण ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.
RayZR 125 Fi Hybrid: 7,759 रुपयांपर्यंत जीएसटी फायदा आणि 3,799 रुपयांपर्यंत कॅशबॅक. हलकी, दमदार आणि स्मार्ट फीचर्ससह येणारी ही स्कूटर दिवाळीच्या खरेदीसाठी आदर्श ठरते.
ग्राहकांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या जवळच्या यामाहा डिलरशिपला भेट देऊन या मर्यादित कालावधीच्या फेस्टिव्ह ऑफर्सचा लाभ घ्यावा.