फोटो सौजन्य: Social Media
आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीची भावना असते. आपली ड्रीम कार खरेदी करण्याचे अनेक जणांचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. भारतात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. टोयोटा ही त्यातीलच एक विश्वासाची कंपनी.
जपानमधील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक टोयोटा अनेक सेगमेंटमध्ये कार्स ऑफर करते. टोयोटा ग्लांझा ही कार कंपनीने हॅचबॅक सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. जर तुम्हीही याचा टॉप व्हेरियंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्ही दरमहा किती EMI भरून ती घरी आणू शकता. त्याबद्दल जाणून घेऊयात.
उकळत्या उन्हात इंजिनची ओव्हरहीटिंग काही केल्या थांबेना ! अशाप्रकारे कारची घ्या काळजी
हॅचबॅक सेगमेंटमध्ये टोयोटा द्वारे ऑफर केलेल्या टोयोटा ग्लांझाचा टॉप व्हेरियंट म्हणून V सादर केला जातो. या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 9.82 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली तर, तुम्हाला 9.82 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त, आरटीओसाठी सुमारे 78 हजार रुपये आणि इंश्युरन्ससाठी सुमारे 48 हजार रुपये द्यावे लागतील.
जर तुम्ही या कारचा टॉप व्हेरियंट खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 9.08 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 9.08 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा फक्त 14616 रुपये ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 9.08 लाख रुपयांचे कार लोन सात वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 14616 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला टोयोटा ग्लांझासाठी सुमारे 3.19 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 14.27 लाख रुपये होईल.
TVS Ntorq 150 भारतात लवकरच होणार लाँच, मिळणार एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स
टोयोटाने हॅचबॅक कार सेगमेंटमध्ये ग्लांझा आणली आहे. यात अनेक उत्तम फीचर्ससह सेफ्टी फीचर्स देखील पाहायला मिळतात.ही कार थेट Maruti Suzuki Baleno, Citroen c3, Hyundai i20, JSW MG Astor शी स्पर्धा करते. याशिवाय, लवकरच लाँच होणारी टाटा अल्ट्रोज फेसलिफ्ट देखील Toyota Glanza ला आव्हान देईल.