फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक कार लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक कारची संख्या अधिक आहे. असे जरी असेल तरी काही अशा कार देखील आहेत, ज्यांच्या विक्रीत नवीन कार आल्यामुळे काहीच फरक पडला नाही. याउलट आजही अनेक ग्राहक त्या कार खरेदी करण्यास जास्त प्राधान्य देत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारुती एर्टिगा.
अनेक वाहन उत्पादक भारतीय मार्केटमध्ये एमपीव्ही सेगमेंटमध्ये विविध मॉडेल्स ऑफर करतात. मारुती सुझुकी देखील या सेगमेंटमध्ये त्यांच्या अनेक कार ऑफर करते. जर तुम्ही Maruti Suzuki Ertiga चा बेस व्हेरियंट Lxi (O) (Petrol) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Automatic SUV खरेदी करण्याच्या विचारात आहात? ‘या’ 5 कारबद्दल जाणून घ्याच, किंमत 10 लाखांपेक्षा कमी
जर तुम्ही एर्टिगाचा बेस व्हेरियंट खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला दरमहा किती EMI भरावे लागेल? चला याबद्दल जाणून घेऊया.
मारुती सुझुकी एर्टिगा Lxi (O) ची किंमत ₹ 8 84 000 (एक्स-शोरूम) आहे. त्याची ऑन-रोड किंमत (61,880 रुपये आरटीओ आणि 45,288 रुपये इंश्युरन्स) 9,91,168 रुपयांपर्यंत पोहोचते.
जर तुम्ही मारुती सुझुकी एर्टिगा Lxi (O) खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करत असाल तर तुम्हाला बँक किंवा फायनान्स कंपनीकडून 7,91,168 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्हाला हे कर्ज एका वर्षासाठी 9% व्याजदराने मिळाले तर तुम्हाला दरमहा 12,729 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील.
उन्हाळयात ‘या’ 5 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्या, अन्यथा बाईक अचानकच देईल धोका !
जर तुम्हाला मारुती सुझुकी एर्टिगासाठी हे कर्ज सात वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने मिळाले तर तुम्हाला एकूण 2,78,082 रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर Maruti Suzuki Ertiga Lxi (O) ची किंमत एकूण 12,69,250 रुपये असेल.
इंजिन: यात 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 103 पीएस पॉवर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. सीएनजी किट असलेले हेच इंजिन 88 पीएस पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क निर्माण करते.
मायलेज: या कारचे पेट्रोल एमटी इंजिन 20.51 किमी/लिटर, पेट्रोल एटी 20.3 किमी/लिटर आणि सीएनजी एमटी 26.11 किमी/किलोग्राम मायलेज देते.
फीचर्स: यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल, दुसऱ्या रांगेतील प्रवाशांसाठी ऑटो एसी आणि छतावरील एसी व्हेंट्स, पुश बटण इंजिन स्टार्ट/स्टॉप, आर्कामिस ट्यून केलेले ६-स्पीकर साउंड सिस्टम आणि ऑटोमॅटिक हेडलाइट्स आहेत.
सेफ्टी फीचर्स: यात एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर, ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल-होल्ड असिस्ट सारखी फीचर्स आहेत.