फोटो सौजन्य: x.com
भारतीय Automobile मार्केटमध्ये टाटा मोटर्सने दमदार कार ऑफर केल्या आहेत. मध्यम वर्गीय व्यक्तींपासून ते श्रीमंत व्यक्तीपर्यंत, प्रत्येक व्यक्तीसाठी Tata Motors ने योग्य कार ऑफर केली आहे. कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये तर उत्तम कार ऑफर केल्या आहेत. अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे टाटा पंच.
आता टाटा मोटर्स पुन्हा एकदा एसयूव्ही सेगमेंटमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. माहितीनुसार, टाटा पंचचे फेसलिफ्टेड व्हर्जन ऑक्टोबर 2025 मध्ये सणासुदीच्या काळात लाँच केले जाऊ शकते. या फेसलिफ्टेड मॉडेलमध्ये केवळ ताजेतवाने लूक आणि डिझाइनच नसेल तर त्याच्या फीचर्समध्ये आणि तंत्रज्ञानातही लक्षणीय अपडेट्स मिळतील, ज्यामुळे ते पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी होईल.
टेस्टिंगदरम्यान समोर आलेल्या फोटोजवरून स्पष्ट होते की टाटा पंच फेसलिफ्टचे डिझाइन मोठ्या प्रमाणात त्याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनपासून प्रेरित असेल. यात येऊ शकणाऱ्या बदलांमध्ये स्लिम LED हेडलॅम्प्स, नवी ग्रिल आणि फ्रेश फ्रंट बंपर डिझाइन यांचा समावेश आहे. याशिवाय, यात C-शेप DRLs देण्यात येऊ शकतात, जे आधीच EV मॉडेलमध्ये पाहायला मिळाले आहेत.
‘या’ आहेत जगातील सर्वात महागड्या Bikes, किंमत एवढी की मुंबईत आलिशान घर बांधून देखील पैसे उरतील
टाटा पंचमध्ये नव्या डिझाइनचे अलॉय व्हील्स आणि रिवाइज्ड रिअर बंपर देखील दिले जाऊ शकतात. या सर्व अपडेट्समुळे ही SUV आधीपेक्षा अधिक बोल्ड, मॉडर्न आणि यूथ-फ्रेंडली दिसणार असून ती तरुण ग्राहकांना विशेषतः आकर्षित करू शकते.
टाटा पंच फेसलिफ्टच्या इंटिरिअरला अधिक प्रीमियम आणि टेक्नॉलॉजीने समृद्ध करण्याचे काम सुरू आहे. यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळणार आहे, जे अधिक चांगला व्हिज्युअल आणि टच अनुभव देईल. तसेच, SUV मध्ये फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात येणार असून ड्रायव्हरला सर्व माहिती एका ठिकाणी मिळेल.
सध्या टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 6.20 लाख ते 10.32 लाख दरम्यान आहे. मात्र फेसलिफ्टमध्ये झालेल्या डिझाइन आणि फीचर्सच्या अपडेट्समुळे किंमतीत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या पंचचे पाच व्हेरिएंट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत – Pure, Pure (O), Adventure S, Adventure+ S आणि Creative+. आशा आहे की हेच व्हेरिएंट्स फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये देखील कायम राहतील.