भारतातील ऑटो उद्योगात गेल्या काही वर्षांपासून बराच मोठा बदल दिसून येत आहे. पूर्वी वाहन खरेदी करताना, निर्णय प्रामुख्याने पुरुष घेत असत, मात्र, आता महिला ग्राहकांचा ऑटोमोबाईल क्षेत्रात महिला ग्राहकांचा सहभाग वेगाने वाढतं आहे. आणि वाहन कंपन्यांच्या नफ्यासाठी हा महत्त्वाचा घटक बनत आहे.
2025 मधील विविध उद्योगांच्या अहवालांनुसार भारतातील वापरलेल्या कारांच्या बाजारपेठेत महिला ग्राहकांचा वाटा लक्षणीयरीत्या वाढला आहे. स्पिनी (Spinny) च्या वार्षिक अहवालानुसार 2024 मध्ये महिला ग्राहकांचा वाटा 26 टक्के होता, जो 2025 मध्ये काही महिन्यांत 46 टक्क्यांपर्यंत पोहोचला. तसेच 2025 च्या पहिल्या तिमाहीत महिलांनी एकूण प्री-ओन्ड कार खरेदीपैकी 28 टक्के व्यवहार केले होते. यामुळे वाहन विक्रेत्यांना नवीन ग्राहकवर्ग मिळाला आहे.
महिलांसाठी कुठली कार आहे एकदम बेस्ट, Automatic की Manual?
महिलांची आर्थिक स्वावलंबनता, वाढते रोजगाराचे प्रमाण आणि सुरक्षित व वैयक्तिक प्रवासाची गरज यामुळे कार व स्कूटर खरेदी वाढत आहे. विशेषतः ऑटोमॅटिक कार, कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि स्कूटर या वाहनांना महिला ग्राहकांकडून अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या आता महिलांसाठी विशेष डिझाइन, सुरक्षा सुविधा आणि सोयीस्कर तंत्रज्ञान विकसित करत आहेत.
दुचाकी क्षेत्रातही महिला ग्राहकांचा प्रभाव वाढत आहे. 2025 मध्ये होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया ने महिला ग्राहकांमध्ये मोठी वाढीची संधी असल्याचे नमूद केले आहे. यामुळे स्कूटर आणि इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीमध्येही सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
कोण म्हणतं महिलांना कार चालवता येत नाही ! Women With Drive …
महिलांची वाढती खरेदीशक्ती केवळ वाहन विक्री वाढवत नाही, तर वित्तपुरवठा, विमा, सेवा केंद्रे आणि डिजिटल वाहन विक्री यांसारख्या संपूर्ण ऑटोमोबाईल परिसंस्थेलाही चालना देत आहे. त्यामुळे भारतीय ऑटो उद्योगाच्या भविष्यातील वाढीमध्ये महिला ग्राहकांची भूमिका अधिक निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट दिसते.






