पेट्रोल-डीझल २८ रुपयांनी महागणार? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण (Photo Credit- X)
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत या अफवांचे खंडन केले आहे. “काही प्रसारमाध्यमांमध्ये इंधन दरवाढीचे दावे केले जात आहेत, मात्र सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही,” असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नागरिकांमध्ये भीती आणि घबराट निर्माण करण्याच्या उद्देशाने अशा दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
FAKE NEWS There are some news reports suggesting a price hike of petrol and diesel. It is hereby clarified that there is no such proposal under consideration by the Government.
Such news items are designed to create fear and panic amongst the citizens and are mischievous and… pic.twitter.com/yTAfJdah2o — Ministry of Petroleum and Natural Gas #MoPNG (@PetroleumMin) April 23, 2026
मंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये पुढे नमूद केले की, “भारत हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे गेल्या चार वर्षांत पेट्रोल आणि डीझलच्या किमतीत वाढ झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असतानाही, भारत सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी भारतीय नागरिकांना या दरवाढीपासून वाचवण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत.”
LPG संदर्भात मोठी अपडेट! आता नवीन गॅस कनेक्शन मिळणार नाही! सरकारचा निर्णय, काय आहे कारण जाणून घ्या…
सरकारने स्पष्ट केले आहे की, देशात पेट्रोल, डीझल आणि एलपीजी (LPG) चा पुरवठा सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी घाईघाईने इंधन खरेदीसाठी गर्दी करू नये आणि केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाने केले आहे.
इंधन पुरवठ्याबाबत सरकारने काही महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे:
प्रशासन सध्या कंपन्यांसोबत मिळून पीएनजी वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करत असून राज्यांना ही प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारताच्या वस्त्र निर्यातीत झाली मोठी वाढ; 3.16 लाख कोटी रुपयांवर पोहोचली निर्यात






