Share Market Today: शेअर बाजारात तेजी कायम राहणार? आजच्या व्यवहारासाठी काय आहे तज्ज्ञांची रणनीती? जाणून घ्या
सोमवारी, सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार मोठ्या तेजीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,००० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स १,०७३.६१ अंकांनी, म्हणजेच १.४२ टक्क्यांनी वाढून ७६,४८८.९६ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ३१२.४० अंकांनी, म्हणजेच १.३२ टक्क्यांनी वाढून २४,०३१.७० अंकांवर स्थिरावला. (फोटो सौजन्य – Pinterest)
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंट विभागातील डेरिव्हेटिव्हज अँड टेक्निकल्सचे प्रमुख चंदन तापारिया आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉक्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये पीएनबी हाउसिंग फायनान्स , अदानी पॉवर आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) यांच्या शेअर्सचा समावेश आहे. आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार ओएनजीसी, आयआरसीटीसी, ब्रेनबीज सोल्युशन्स (फर्स्टक्राय), जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सिमेन्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल), रेल विकास निगम (आरव्हीएनएल), सुझलॉन एनर्जी, वन९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम), पाइन लॅब्स, आयआरएफसी, जेएसडब्ल्यू एनर्जी, रेमंड या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.
प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार टाटा पॉवर, एसआरएफ आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक हे शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याचा विचार करू शकतात. निओट्रेडरचे सह-संस्थापक आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे राजा व्यंकटरमण यांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, बँक ऑफ बडोदा , अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड, आयओएन एक्सचेंज (इंडिया) लिमिटेड आणि फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या पाच शेअर्सची निवड केली आहे.






