महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकनेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २६ मे चा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आज, २६ मे, आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी देखील अत्यंत विशेष आहे. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा जन्मदिवस आहे. १९७४ मध्ये बाभळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पादापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती. युवा कॉंग्रेसचे नेते, उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचे उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना कामकाज पाहिले आहे. यानंतर १९८० मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, सांस्कृतिक, महसूल अशा अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार प्रभावीपणे पाहिला. त्यांची प्रशासनावर अत्यंत मजबूत पकड होती. आपल्या प्रभावी वक्तृत्त्वाने त्यांनी अनेक सभा गाजवल्या होत्या.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या रंगभूमीसाठीही अत्यंत खास दिवस आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्राची रंगभूमी गाजवणारे प्रसिद्ध नाटककार, विनोदी लेखक आणि कवी राम गणेश गडकरी यांचा जन्मदिवस आहे. त्यांना गोविंदाग्रज म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी या नावाने १५० कविता लिहिल्या आहेत. तर बाळकराम या टोपनावाने काही विनोदी लेख लिहिले आहेत. एकट प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव आणि भावबंधन ही चार नाटकेही लिहिली आहेत. राम गडकरी यांना महाराष्ट्राचा शेक्सपियर असे म्हटले जायचे.
26 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
26 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






