Share Market Today: मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम! सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडण्याची शक्यता
शुक्रवारी, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरणानंतर भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,४०० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स ११६.६७ अंकांनी, म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घसरून ७४,२४३.३४ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ४९.८५ अंकांनी, म्हणजेच ०.२१ टक्क्यांनी घसरून २३,३६६.७० वर स्थिरावला. आज देखील शेअर बाजारात मोठी घसरण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदांराना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार अदानी एनर्जी सोल्युशन्स / अदानी एंटरप्रायझेस, अलेम्बिक फार्मास्युटिकल्स, अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स, क्रिएटिव्ह न्यूटेक, ईएमएस, एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग, हिंदुस्तान झिंक, लेन्सकार्ट सोल्युशन्स, पाइन लॅब्स, पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरी, स्टरलाइट टेक्नॉलॉजीज, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी किंवा विक्रीसाठी श्नाइडर इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर, ॲक्सिस बँक आणि आयनॉक्स ग्रीन या तीन शेअर्सची शिफारस केली आहे.
Defense Stocks : 3.5 लाख कोटींची ऑर्डर बुक! डिफेन्स क्षेत्रातील ‘या’ 3 शेअर्सवर तज्ज्ञांची नजर
आनंद राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स येथील इक्विटी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक, जिगर एस. पटेल यांच्या मते पुढील १-२ आठवड्यांसाठी गुंतवणूकदार झेन टेक्नॉलॉजीज, व्होल्टास, व्हीबीएल हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार ग्रीव्हज कॉटन लिमिटेड, सारेगामा इंडिया लिमिटेड, एनआरबी बेअरिंग्ज लिमिटेड, अपोलो पाईप्स लिमिटेड आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स हे स्टॉक्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.






