(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जागतिक युद्धाची परिस्थिती त्यानुसार शेअर बाजारावरही त्याचा परिणाम दिसून आला. त्यामुले शेअर बाजारातील चढ-उतारात यावर्षी IPO बाजारात बरीच मंदी दिसून आली आहे. गुंतवणूकदारही तितकेसे प्रभावी दिसून आले नाहीत. एका अहवालानुसार, यावर्षी आतापर्यंत केवळ २३ कंपन्यांनी प्राथमिक बाजारात २७,००० कोटी रुपये उभारले आहेत. पण वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ही परिस्थिती बदलू शकते असा अंदाज आहे. मुकेश अंबानींची कंपनी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज संयुक्तपणे अंदाजे ६ अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे ५७,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहेत. दोन्ही कंपन्या या आठवड्यात त्यांच्या IPO साठी ड्राफ्ट पेपर दाखल फाइल करणार आहेत.
रिलायन्स Jio चा IPO हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा इश्यू असेल. फायनान्शिअल टाइम्समधील एका अहवालानुसार, जिओ शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी (AGM) भांडवली बाजार नियामक सेबीकडे अंदाजे ४ अब्ज डॉलर्सच्या IPO साठी मसुदा माहितीपत्रक सादर करू शकते.
रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गेल्या वर्षी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) घोषणा केली होती की ते २०२६ च्या पहिल्या सहामाहीत जिओचा IPO आणतील. पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी केलेलं विधान शक्य होणं कठीण आहे. हे वर्ष रिलायन्ससाठी कठीण गेले आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे कंपनीच्या मुख्य रिफायनिंग व्यवसायावर परिणाम झाला आहे. यावर्षी रिलायन्सच्या मूल्यांकनात अंदाजे १५% घट झाली आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात १३% घट झाली. त्यामुळे कंपनीसाठी हा काळ थोडा कठीण स्वरुपाचा राहिला आहे.
4 अब्ज डॉलर्सचा जिओचा इश्यू हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असणार आहे. आतापर्यंत हा विक्रम Hyundai Motor India च्या नावावर आहे ज्याचा IPO आकार $3.3 अब्ज होता. ET ने मे मध्ये अहवाल दिला होता की रिलायन्स आपल्या संरचनेत बदल करत आहे. सध्याच्या गुंतवणुकदारांसोबत किमतीबाबत मतभेद झाल्यानंतर ते विक्रीसाठी ऑफरमधून पूर्णपणे ताज्या इश्यूमध्ये रूपांतरित केले जात आहे.
जिओ व्यतिरिक्त, एनएसई देखील शुक्रवारपर्यंत सेबीकडे आपले मसुदा कागदपत्रे दाखल करेल अशी अपेक्षा आहे. NSE चे शेअर्स सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये सुमारे ₹१,९५०-₹२,०५० वर ट्रेड करत आहेत. या किमतीनुसार, तिचे मूल्यांकन अंदाजे ₹५ लाख कोटी आहे, ज्यामुळे ती देशातील सर्वात मौल्यवान सूचीबद्ध वित्तीय कंपन्यांपैकी एक बनते. पण कंपनीचा IPO पूर्णपणे OFS असू शकतो.
‘होर्मुझपेक्षाही मोठं संकट घोघावतंय…’, भारतासाठी कोण ठरु शकतं डोकेदुखी? तज्ज्ञांकडून मोठा इशारा






