(फोटो- सोशल मिडिया)
Transrail Lighting : ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड ही पॉवर टी अँड डी म्हणजेच पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन) क्षेत्रावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणारी आणि लॅटिस स्ट्रक्चर्स, कंडक्टर्स व मोनोपोल्ससाठी एकात्मिक उत्पादन सुविधा असणारी भारतातील अग्रगण्य ईपीसी कंपनी आहे. या कंपनीने आज चौथी तिमाही आणि आर्थिक वर्ष २०२६ चे आपले निकाल जाहीर केले.
कंपनीच्या संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६च्या कामगिरीचा विचार केला तर, कार्यसंचालनांमधून मिळालेल्या महसुलात वार्षिक आधारावर ३० टक्क्यांची मजबूत वाढ झाली असून, हा महसूल आर्थिक वर्ष २०२५ मधील ५,३०८ कोटी रुपयांवरून वाढून ६,८८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या काळात कंपनीचा ईबीआयटीडीए देखील २१ टक्क्यांच्या वाढीसह ६७६ कोटी रुपयांवरून ८२० कोटी रुपये झाला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग करपूर्व नफा२५ टक्क्यांनी वाढून ५८४ कोटी रुपये नोंदवला गेला जो मागील वर्षी ४६७ कोटी रुपये होता आणि कर खर्च १८ टक्क्यांनी वाढून १६३ कोटी रुपये झाला. परिणामी, संपूर्ण आर्थिक वर्ष २०२६ साठी कंपनीचा ऑपरेटिंग करोत्तर नफा २८ टक्क्यांच्या उल्लेखनीय वाढीसह ४२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षात ३२९ कोटी रुपये होता. दरम्यान, कंपनीचा ऑपरेटिंग करोत्तर नफा मार्जिन ६.१ टक्क्यांवर स्थिर राहिला आहे.
या निकालांबाबत मत व्यक्त करत एमडी आणि सीईओ श्री. रणदीप नारंग म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ मधील ही उत्कृष्ट कामगिरी बदलत्या व्यावसायिक वातावरणातही ट्रान्सरेलचा सातत्यपूर्ण वाढीचा वेग निदर्शनास आणते. आम्ही आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल, ईबीआयटीडीए आणि करोत्तर नफा नोंदवला आहे. प्रमुख व्यावसायिक क्षेत्रे आणि विविध भौगोलिक बाजारपेठांमधील मजबूत अंमलबजावणीमुळे हे शक्य झाले आहे, यामुळे आम्हाला उद्योगात आघाडीचे नफा मार्जिन राखण्यात यश आले आहे.
याशिवाय, खेळत्या भांडवलाची कार्यक्षमता वाढवून, कर्ज कमी करून आणि ८१७ कोटी रुपयांचा प्रबळ ऑपरेटिंग कॅश फ्लो निर्माण करून आम्ही आम्ही बॅलन्स शीट अधिक मजबूत करण्यात मोठी प्रगती केली आहे. हा कॅश फ्लो गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.
या वर्षादरम्यान, आम्ही आमची टॉवर उत्पादन क्षमता दुप्पट केली आहे आणि बुटीबोरी येथे नवीन ग्रीनफिल्ड प्लांट सुरू केला आहे. तसेच कंडक्टर्ससाठी देखील अशीच क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. उत्तम ऑर्डर बुक आणि विविध व्यवसाय व भौगोलिक क्षेत्रांमधील नवीन ऑर्डर्स मिळवण्याची प्रबळ क्षमता याच्या जोरावर ट्रान्सरेल मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी आपला वाढीचा आलेख कायम राखण्यास पूर्णपणे सज्ज आहे.
Supreme Court चा निकाल आणि क्रॅश झाला ‘हा’ शेअर, आज तब्बल 16 टक्क्यांनी गडगडले भाव!






