(फोटो सौजन्य: Pinterest)
Paytm Pocket Money : आजच्या डिजिटल युगात आपले सगळे व्यवहार डिजीटल स्वरुपात झालेले आहेत. त्यातही आता बरेच बदल होताना दिसत आहेत. एक काळ असा होता, जेव्हा लोकांना काहीही खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असे; मात्र आज, खरेदीपासून ते बँकिंगशी संबंधित कामांपर्यंत सर्व काही अगदी घरात बसल्या बसल्या आरामात, अवघ्या काही मिनिटांमध्ये ते काम पूर्ण करु शकतो. पण बऱ्याचवेळेला काही अनेकदा तरुण-तरुणींकडे त्यांचं स्वतःचे बँक खाते नसल्यामुळे, त्यांना पूर्णपणे आपल्या पालकांवरच अवलंबून राहावे लागते. आता हेच समीकरण बदलणार आहे. यासाठी Paytm ने नवा अंदाज मार्केटमध्ये आणला आहे. ‘Paytm Pocket Money’ हे feature सादर करून, फिनटेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘Paytm’ एका नव्या उपक्रमाची सुरुवात करत आहे.
Paytm Pocket Money या फीचर्सचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुलांना पेमेंट्स करण्याचे स्वातंत्र्य दिले असले तरीही, पालक त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवू शकतील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, या वैशिष्ट्यामुळे पैशांवरील संपूर्ण नियंत्रण पालकांकडेच राहील याची खात्री मिळते. शिवाय, आता पालक आपल्या Paytm ॲपचा वापर करून केवळ आपल्या मुलांच्या खर्चाची मर्यादाच निश्चित करू शकणार नाहीत, तर त्यांनी केलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या व्यवहारावरही लक्ष ठेवू शकतील.
थोडक्यात सांगायचे तर, हे नवीन वैशिष्ट्य पूर्णपणे ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ म्हणजेच NPCI ने विकसित केलेल्या ‘UPI Circle’ तंत्रज्ञानावर आधारित आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, या नवीन वैशिष्ट्याच्या माध्यमातून, Primary Account Holder अशा कुटुंबातील सदस्यासाठी डिजिटल व्यवहारांना अधिकृत करू शकतो, ज्याच्याकडे स्वतःचे बँक खाते नाही. त्यामुळे त्याचा संदर्भ थेट पालकांच्या खात्यावर आहे.
या फीचर्समुळे आता पालकांना दरमहा खर्चाची मर्यादा ₹१५,००० पर्यंत सहज आणि विनासायास निश्चित करणे शक्य झाले आहे. याव्यतिरिक्त, एकाच व्यवहाराची मर्यादा ₹५,००० इतकी निश्चित करण्यात आली आहे. शिवाय, काही विशिष्ट निर्बंधांच्या अधीन राहून, ही सेवा बचत आणि Current या दोन्ही खात्यांसाठी पूर्णपणे कार्यरत असेल; पण सुरक्षेच्या दृष्टीने, या सेवेचा वापर करून आंतरराष्ट्रीय पेमेंट्स आणि रोख रक्कम काढण्यावर सध्या निर्बंध घालण्यात आले आहेत.
Petrol – Diesel बाबत सरकारचा मोठा निर्णय, 1 जूनपासून लागू होणारी करकपात जाहीर; काय होणार परिणाम?






