सौजन्य - नवराष्ट्र टीम
‘सर्वसामान्य कुटुंबांमधील तरुणांना स्वतःचे उद्योग व्यवसाय उभे करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ‘स्व’ रूपवर्धिनी, ‘दे आरारा फाउंडेशन’, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि एफआयएनएनएपीपी यांच्या संयुक्तपणे इनोबिझ कॉन्क्लेव्ह फर्ग्युसन कॉलेजच्या इंफी थियटर येथे आयोजीत परिषदमध्ये ते बोलत होते. यावेळी सह्याद्री फार्म्स याचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, आनंद गोडसे, किशोर बेलोरी, प्रमोद रावत आदी उद्योजक उपस्थित होते.
विवेक सावंत पुढे म्हणाले की, सामान्य नागरिकांच्या गरजा शोधण्यासाठी प्रत्यक्ष बाजारात गेलो आहोत का? आठवडी बाजाराचा अभ्यास केला आहे का? एखादी वस्तू खरेदी करण्याचा निर्णय ते कसा घेतात, याबाबत आपण कधी सखोल विचार व संशोधन केले आहे का? हा मुख्य प्रश्न आहे. या दिशेने निश्चितच अभ्यास होण्याची गरज आहे.
उद्योजक विलास शिंदे म्हणाले, शेतीकरण हे पुर्णपणे व्यवसायीक आहे. त्या दृष्टीने त्याकडे पाहीले पाहीजे. जागतीक व्यावसायीक वेदनेतून गेल्याशिवाय मोठे व्यवसायीक होणार नाहीत. आणि समजाच्या किवा देशांच्या गरजा ओळखून आपण व्यासाय केला तर यशस्वी होऊ.
ग्रीन उद्योजकतेची नवी दिशा
मागील आणि सध्याच्या पिढीने पृथ्वीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. ते दुरुस्त करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रचंड व्यावसायिकांना संधी निर्माण होऊ शकतात. सध्या जगभरात ‘ग्रीन एंटरप्राईजेस’ उदयास येत आहेत. बहुतेक विकसित देशांमध्ये सुमारे चार टक्के व्यवसाय हे पर्यावरणपूरक उद्योगांशी संबंधित आहेत. आपण वापरलेल्या वस्तूंचा पुनर्वापर कसा करता येईल, या दृष्टीने सुरू असलेला विचार व बदल ही उद्योजकतेची नवी दिशा ठरत आहे, असे विवेक सांवत यांनी संगीतले.






