फोटो सौजन्य- सोशल मीडिया
La Trobe University Scholarship: उच्च माध्यमिक शिक्षण (इयत्ता १२ वी उत्तीर्ण) पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे परदेशात जाऊन पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न असते. मात्र, अर्थिक टंचाईमुळे कित्येक विद्यार्थ्यांना आपले हे स्वप्न बाजूला ठेवावे लागते. जर तुम्हीही अशाच विद्यार्थ्यांपैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ऑस्ट्रेलियातील एक नामांकित विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी देत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी’कडून (La Trobe University) एका उत्तम स्कॉलरशिपची सुरुवात करण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी अत्यंत कमी खर्चात शिक्षण घेऊ शकतात. विशेष म्हणजे या स्कॉलरशिपचा फायदा पदवी आणि पद्व्युत्तर या दोन्ही कोर्ससाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येईल.
ला ट्रोब युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना थेट पैसे न मिळता त्यांच्या शैक्षणिक शुल्कात (ट्युशन फी) सवलत दिली जाईल.
जे विद्यार्थी ६०% ते ७४.९ % WAM/ATAR दरम्यान स्कोर करतील. त्यांना २०% सवलत तर ७५% हून अधिक स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीमध्ये २५% सवलत दिली जाईल.
महत्त्वाची बाब म्हणजे या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांना कोणताही वेगळा अर्ज करावा लागत नसून, विद्यार्थी जेव्हा या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशासाठी (Admission) अर्ज करतील. त्याच अर्जाच्या आधारे त्यांची स्कॉलरशिपसाठी पात्रता तपासली जाईल. ज्या विद्यार्थ्यांची या युनिव्हर्सिटीकडून स्कॉलरशिपसाठी निवड होईल. त्यांना ऑफर लेटर(Offer Letter) दिले जाईल.






