फोटो सौजन्य- सोशल मीडिया
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ATD (आर्ट टीचर्स डिप्लोमा) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना नर्सरी ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये ड्रॉइंग किंवा क्राफ्ट टीचर म्हणून काम करण्याची संधी मिळते. तसेच आता अनेक शाळांमध्ये ड्रॉइंग आणि क्राफ्ट शिक्षकांची नियुक्ती आवश्यक मानली जाते. त्यामुळे बारावीमध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही या कोर्समध्ये प्रवेशाची संधी मिळू शकते.
चित्रकला क्षेत्रात कौशल्य आणि सर्जनशीलतेच्या जोरावर उत्तम करिअर घडवता येते. सुरुवातीला दहा हजार रुपयांपासून रोजगाराची संधी मिळू शकते, तर अनुभव आणि गुणवत्तेनुसार लाखो रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याचीही क्षमता या क्षेत्रात आहे.






