फोटो सौजन्य - Social Media
छत्तीसगड सार्वजनिक सूचना संचालनालयाचा नवीन आदेश आहे की शाळेतील शिक्षकांना आता भटके कुत्रे, साप, विंचू यांच्यावर लक्ष विशेष लक्ष ठेवावे लागणार आहे. तसेच शाळेतील परिसरात कोणत्याही विषारी प्राण्याचा शिरकाव होऊ नये, याची संपूर्ण जबाबदारी तेथील शिक्षकांवर टाकण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला करत सर्व जिल्हा शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापकांना आदेश जारी करण्यात आले आहे. या निर्णयानुसार शाळेत बैठका घेऊन शिक्षकांना सूचना देण्याचे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत.
शासनाच्या या निर्णयावर शिक्षकांनी टीका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की हा निर्णय हास्यास्पद आहे. निरनिराळ्या शिक्षक संघटना पेटून उठल्या आहेत. त्यांनी सरळ प्रशासनालाच “साप आणि विंचूपासून, आमचे संरक्षण कोण करणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांच्या जीवाची काहीच परवाह केली गेली नसल्याचे एकंदरीत समोर येत आहे. तरी DEO विजय तांडे यांनी शिक्षकांनी शासनाच्या या निर्णयाचा मान राखून त्या निर्णयाचे पालन करण्याचे सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिक्षकांवर देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांचे काम आणखीन वाढले आहे. नदी/तलावात दुर्घटना, जीर्ण इमारतीत अपघात, किंवा मध्यान्ह भोजन निकृष्ट आढळल्यास शिक्षकांवर कारवाई होणार. आधीच SIR काम, आता कुत्रे पकडणाऱ्यांना माहिती देण्याची जबाबदारीही शिक्षकांवर आल्यामुळे त्यांची तारांबळ उडत आहे असे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय शर्मा यांनी सरळ सरकारवर निशाणा साधत म्हंटले आहे की शिक्षकांचा मान राखा! अशा वाढत्या कामांमुळे त्यांच्या प्रार्थमिक कामात व्यत्यय येत आहे. २० नोव्हेंबरचा डीपीआय आदेश: भटके कुत्रे ओळखून महानगरपालिका/पंचायतीला कळवणे अनिवार्य.






