फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Largest District in India : भारतातील प्रत्येक राज्य आणि जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे, पण तुम्हाला का आपल्या देशात असा एक जिल्हा आहे, ज्याचे क्षेत्रफळ अनेक राज्यापेक्षाही मोठे आहे. चला तर मग जाणून घेऊया या जिल्ह्याशी संबंधित काही रंचक गोष्टी……
आपल्या देशाच्या गुजरात राज्यातील ‘कच्छ’ जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा आहे. विशेष म्हणजे यासमोर हरियाणा, केरळ आणि गोवा यांसारखी राज्ये ही लहान वाटतात. सरकारी वेबसाइटनुसार, कच्छचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४५,६७४ वर्ग किलोमीटर आहे. भारताच्या पश्चिम भागात आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून स्थित असलेला हा जिल्हा सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे.
कच्छचे क्षेत्रफळ अनेक राज्यांपेक्षाही जास्त असल्यांने दिल्ली, चंदीगड आणि लक्षद्वीपसारखे केंद्रशासित प्रदेशही कच्छसमोर अत्यंत लहान दिसतात. खूप मोठा परिसर असलेल्या या क्षेत्रात वाळवंट, शेतीची जमीन, सागरी क्षेत्र आणि अनेक नैसर्गिक स्थळे अस्तित्वात आहेत. येथील भौगोलिक विविधता या जिल्ह्याला अधिक खास बनवते.
कच्छ हा केवळ भौगोलिक आकाराने हा जिल्हा मोठा नसून त्याचा इतिहासही खूप जुना आणि रंजक मानला जातो. प्राचीन महाभारतासारख्या ग्रंथातही याचा उल्लेख आढळतो. इतिहासकारांच्या मते, पूर्वी या परिसराला अभिर नावाने ओळखले जायचे. असे म्हंटले जाते की, या देशाची भौगोलिक आकृती कासवासारखी दिसत असल्याने त्याचे नाव कच्छ पडले. येथे अनेक राजवंशांनी शासन केले. तसेच प्रदीर्घ काळात हे सागरी संपर्काचे केंद्र बनले.
येथील वाळवंट जगभरात ओळखले जाते कारण ‘रण ऑफ कच्छ’ पांढऱ्या मिठासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी ‘रण उत्सव’ आयोजित केला जातो. येथील संस्कृती, संगीत आणि पारंपारिक कला विदेशी पर्यटकांना या प्रदेशाकडे आकर्षित करतात. या जिल्ह्याचे मुख्यालय ‘भुज’ हे शहर असून ते मुख्य प्रशासकिय आणि सांस्कृतिक केंद्र आहे.






