फोटो सौजन्य - सोशल मीडिया
आयोगाने जाहीर केलेल्या तारखेनुसार, सर्व इच्छुक उमेद्वार २ फेब्रुवारी २०२७ पर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. सर्व उमेद्वारांची पूर्व परीक्षा एकाच दिवशी घेतली जाणार असून या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय वन सेवा पूर्व परीक्षेचेही आयोजन केले जाईल.
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व (Prelims) परीक्षेनंतर लवकरच २० रोजी मुख्य(Mains) परीक्षा घेतली जाईल. ही मुख्य परीक्षा सलग ५ दिवस चालणार आहे, या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेद्वारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ज्यानंतर अंतिम निकाल घोषित केला जाईल.
यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात मोठी, प्रतिष्ठित आणि कठीण परीक्षा मानली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) यांसह विविध केंद्रीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या परीक्षेस दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात.
यूपीएससी (UPSC) नागरी सेवा आयोगाने स्पष्ट कले आहे की, परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होऊ शकतात त्यामुळे सर्व परीक्षार्थींनी वेळोवेळी यूपीएससीच्या अधिकृत upsc.gov.in वेबसाईटला भेट द्यावी.






