हृदयाचे ठोके वाढले! उद्या दुपारी १ वाजता लागणार बारावीचा निकाल (Photo Credit- X)
यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.
नोकरी मिळत नसेल तर स्ट्रॅटेजी बदला, कोणकोणत्या ठिकाणी शोधू शकता जॉब… जाणून घ्या
विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण उद्या दुपारी १ वाजल्यापासून खालील संकेतस्थळांवर पाहता येतील व त्याची प्रिंट आऊट घेता येईल:
३. https://results.digilocker.gov.in
3. https://results.targetpublications.org/
विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेता, डिजीलॉकरमध्ये आपली डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या संपूर्ण कॉलेजचा एकत्रित निकाल मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिला जाईल. तसेच निकालाबाबत काही शंका असल्यास विद्यार्थ्यांना ३ मे ते १७ मे या कालावधीत गुणपडताळणी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत https://mahahsscboard.inया संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.






