फोटो सौजन्य - सोशल मीडिया
RCC Nanded: आरसीसी प्रमुख शिवराज मोटेगावकर यास अटक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. दरम्यान सोमवारी नांदेड शहरातील अनेक नांमांकित कोचिंग क्लासेस पूर्वसूचना न देता बंद झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण होत आहे.
नांदेड जिल्हा हा अलीकडच्या काळात शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखला जात आहे. या शहरात वेगवेगळे प्रसिद्ध खाजगी कोचिंग क्लासेस आहेत. येथे अनेक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात प्रवेश नाममात्र असून खाजगी कोचिंग क्लासेसला त्यांची हजेरी असते. तसेच येथे अनेक कोचिंग क्लासेस चालक पालकांना चांगल्या मार्क्सचे अमिष दाखवून त्यांच्याकडून भरमसाठ पैसा उगळतात.
नांदेडमध्ये केवळ जिल्ह्यातलेच नव्हे तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी नीट व जेईई परीक्षेच्या तयारीसाठी येत असातात. या शहरातील श्रीनगर, भाग्यनगर, आनंदनगर, अशोकनगर यांसारख्या गजबजलेल्या भागात सुरु असलेल्या कोचिंग क्लासमध्ये परराज्यातील प्राध्यापक नाममात्र दरात शिकवत आहेत. नीट प्रकरणामुळे कोचिंग क्लासेसमध्ये सुरु असलेली गैरव्यवहार आणि गैरप्रकार उघड होताच आता पालक पुन्हा एकदा गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत.
मोटेगावकर यांच्या चार दिवसापासून सुरु असलेल्या चौकशीनंतर नांदेडमधील पालकांची ही चौकशी होत आहे. मोटेगावकर आरसीसीच्या नांदेड शाखेत सध्या दोन हजारांपेक्षा अधिक विद्यांर्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थी-पालकांमध्ये आता अधिक संभ्रम निर्माण होत आहे.
दहीवीचा निकाल नुकताच लागला आहे, या निकालानंतर अनेक विद्यार्थी मोठे स्वप्न उराशी बाळगून मोठ्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश मिळवतात. मात्र, परीक्षेतील या गोधळांमुळे विद्यार्थी आणि पालकांची द्विधा मनस्थिती झाली आहे.
MHT-CET 2026: सीईटी परीक्षेत खरोखरच घोटाळा झालाय का? ‘त्या’ व्हायरल गुणवत्ता यादीमागचे सत्य काय?
पेपरफुटीच्या प्रकरणात समविष्ट असलेल्या सर्व दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. छावा, एसएफआय व शिवसेना उबाठाने या मागणी संबंधीत सोमवारी शहरात निदर्शने केली. दरम्यान पालकांना तसेच विद्यार्थ्यांना खेचण्यासाठी कोचिंग सेंटरवाले मनमानी करतात, असा आरोप करून काही संघटनांनी परीक्षेत पारदर्शकता असावी असे मत व्यक्त केले.






