फोटो सौैजन्य - Social Media
जगातील काही नोकऱ्या फक्त कौशल्य, शिक्षण आणि अनुभवावर निवडत नाहीत, तर त्यांच्या भरती प्रक्रियाही इतक्या कठीण असतात की त्या पार करणे हे स्वतःतच एक पराक्रम असतो. या भरती पार करणाऱ्या उमेदवारांचे भवितव्यही फार सुंदर असते, मोठया रक्कमेच्या या नोकऱ्या मिळवणेही तितकेच कठीण! चला तर मग जाणून घेऊयात, जगातील सगळ्यात कठीण असणाऱ्या ‘या’ भरती प्रक्रिया संदर्भात:
सगळ्यात कठीण मानली जाणारी भरती प्रक्रिये पैकी एक म्हणजे भारतातील IAS पदासाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रिया! Indian Administrative Services (IAS) अधिकारी बनण्यासाठी दरवर्षी दहा लाखांहून अधिक उमेदवार तयारी करतात तसेच स्पर्धा परीक्षेला उपस्थित राहतात. पण त्यातील काही ७०० ते ८०० उमेदवाराच या परीक्षेला पात्र करतात आणि IAS पदी आपले नाव कोरतात. परीक्षेचा आवाका, विषयांची विविधता आणि मानसिक दबाव यामुळे ही प्रक्रिया अत्यंत कठीण मानली जाते.
अमेरिकेची United States Navy SEALs ही भरती प्रक्रिया पार करण्यासाठी अत्यंत तगडी शारीरिक आणि मानसिक तयारी असणे आवश्यक मानली जाते, त्यामुळे ही भरती प्रक्रिया देखील कठीण मानली जाते. “Hell Week” नावाने ओळखले जाणारे सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळाचे दिवस यामध्ये पात्र करावे लागतात. मुळात, केवळ २५% प्रशिक्षार्थी या प्रक्रियेत शेवटपर्यंत पोहोचतात.
UK च्या MI6 Intelligence Officer (UK Secret Service) भरती प्रक्रियेत सायकोलॉजिकल, IQ, लॉजिक, आणि खूप कडक बॅकग्राऊंड तपासणी अशा विविध चाचण्यांना पात्र करावे लागते. अतिशय गोपनीय असणारी ही भरती प्रक्रिया अत्यंत कठीण देखील मानली जाते. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका असल्यामुळे निवड प्रक्रियेची कसून छाननी होते. UK आणि भारताची मार्चन नेव्हीसाठी घेण्यात येणारी भरती प्रक्रियादेखील कठीण मानली जाते. तसेच हजारोंच्या संख्येत परीक्षेत उपेक्षित राहून फक्त मोजक्याच जणांची नियुक्ती करणारी Japanese Foreign Service Examination ही भरती प्रक्रियादेखील फार कठीण मानली जाते.