(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jingping) यांचा एक महान नेता असा उल्लेख केला आहे. जिनपिंग यांनी खास मित्र म्हटले आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, जिनपिंग यांच्यासारखा खरा मित्र मिळणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही अत्यंत कठीण प्रसंगावर संवाद साधला असून मार्ग काढणे अत्यंत सोपे होते, असे ट्रम्प यांनी म्हटले.
याशिवाय ट्रम्प यांनी चिनी लष्कराच्या शिस्तीचे आणि सामर्थ्याचेही गुणगाण गायले. त्यांच्या मते, चीनचे लष्कर जगातील सर्वात शक्तिशाली असून त्यांच्याशी दुसऱ्या कोणत्याही लष्कराची तुलना होऊ शकत नाही असेही म्हटले.
.@POTUS meets with President Xi at the Great Hall of the People in Beijing: “It’s an honor to be with you, it’s an honor to be your friend, and the relationship between China and the U.S.A. is going to be better than ever before. Thank you very much!” pic.twitter.com/aepz02qOgj — Rapid Response 47 (@RapidResponse47) May 14, 2026
सध्या हा दौरा अमेरिका चीन(China) मधील व्यापारी संबंधांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्याचा उद्देश दोन्ही देशांतील व्यापार तणाव कमी करणे आहे. यासाठी ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकन उद्योगपतींचे एक शिष्टमंडळ देखील चीनमध्ये दाखल झाले आहे.
यामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक, गुतंवणूक अशा विविध क्षेत्रातील सीईओंचा समावेश आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या देशांमधील व्यापारिक दरी कमी करण्यावर दोन्ही देश एकमत झाले आहेत. या नव्या व्यापारी युतीमुळे जगातकि स्तरावर अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या स्वागत सोहळ्यात चिनी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी तेथील लहान मुलांचे नृत्य पाहून ट्रम्प भारावून गेले. त्यांनी म्हटले की, ही मुले चीनच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहेत. या भेटीमुळे अमेरिका(America)-चीनमधील तणाव निवळून एका नव्या सहकार्याची सुरुवात होत असल्याचे राजकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
Ans: अध्यक्ष ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांचे तोंडभरुन कौतुक केले. जिनपिंग यांना एक महाना नेता आणि खास मित्र म्हणून संबोधले. त्यांच्याशी संवादामुळे अनेक प्रश्न सुटले असल्याचाही दावा त्यांनी केला.
Ans: ट्रम्प यांच्या मते, चीनचे लष्कर जगातील सर्वात शक्तिशाली असून त्यांच्यासारखे दुसरे कोणीही नाही असे म्हटले.
Ans: ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याचा मुख्य उद्देश अमेरिका चीनमधील द्विपक्षीय संबंध आणि व्यापारा संबंध सुधारणे आहे.






