NEET परीक्षेचे गुण वाढवून देतो म्हणत 1.10 कोटींचा गंडा; आधी विश्वास संपादन केला अन् नंतर... (संग्रहित फोटो)
सोलापूर : वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची समजली जाणारी नीट या परीक्षेमध्ये गुण 600 पेक्षा जास्त गुण वाढवून देतो, असा विश्वास संपादन करून एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक केली. सदरची घटना २०२३ ते २०२४ च्या दरम्यान सात रस्ता सोलापूर येथे घडली. याप्रकरणी मेहदीअली ईकराम सय्यद (वय ४७, रा. टिळक नगर, मजरेवाडी, सोलापूर) यांनी आरोपी अरविंद गोविंद चंडक (रा. साई सत्यम रेसिडेन्सी, भवानी पेठ, सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यात माहिती अशी की, वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या नीट (राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षेत यातील आरोपी अरविंद चंडक यांनी फिर्यादी मेहदीअली सय्यद यांना बेळगाव कर्नाटक येथील नीट परीक्षेचे मॅनेजमेंट करून तुमचा मुलगा अहमद याला त्याच्या नीटच्या परीक्षेमध्ये ६०० पेक्षा जास्त गुण वाढवून देतो, असे म्हणून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यापुढे आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेऊन १ कोटी १० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकारामध्ये आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्याने आरोपी यांच्याकडे विचारणा केली. मात्र, उलट आरोपीने फिर्यादी यांच्याकडून रक्कम घेऊन दमदाटी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत, द्राक्ष आणि डाळिंब निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यास दुबईतील कंपनीने एक कोटी 36 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दुबई, पाकिस्तानातील कंपनीच्या दोन मालकांसह मुंबईतील दोघा कर्मचाऱ्यांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पौर्णिमा विजय पाटील (वय ४२, रा. उत्तर शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली.
पुण्यातही तरूणाची फसवणूक
इन्स्टाग्रामवर ओळख अन् त्यातून होणाऱ्या फसवणूक प्रकरणात वाढ होत असतानाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीने भेटीचं आमिष दाखवून तरुणाला भेटण्यास बोलावले. नंतर कात्रज घाटात जाऊ म्हणत त्याला रस्त्यात थांबवून साथीदारामार्फत लुटल्याचा प्रकार घडला आहे. त्याला पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील या टोळीने दिली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तरुणीसह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.
हेदेखील वाचा : Buldhana News: डोणगावमध्ये ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ प्रकल्पात गैरव्यवहार? गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी






