संग्रहित फोटो
पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून सतत महिलावरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पिकअप चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अंधाराचा फायदा घेऊन तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान याप्रकरणी पिकअप चालक नंदु जाधव (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ ऑगस्ट रोजी सव्वा अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याबाबत २६ वर्षीय तरूणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी ही दैनदिन नोकरीचे काम आटोपून थेऊर फाटा येथून राहत्या घरी जाण्यास निघाली होती. ती खासगी वाहनाची वाट पाहत हाती. यावेळी नंदु हा पिक घेऊन तरूणी उभी असलेल्या ठिकाणी आला. त्याने तरूणीला गाडीत बसण्याकरीता विचारणा केली. त्यानुसार होकार देत तरूणी आरोपीच्या पिकअपमध्ये बसली. नंतर आरोपीने तिला अश्लिल स्पर्श करून खाद्यावर हात टाकला. तसेच, त्याने तिला काय होतंय एवढं, मला भाडे देवु नका फक्त मला खुश करा असे म्हणून तरूणीचा विनयभंग केला. अधिक तपास पोलिस करत आहेत.
चौदा वर्षाच्या मुलीवर अत्याचार
चौदा वर्षाच्या अल्पवीयन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसाखाली एकाला सिंहगरोड पोलिसांनी अटक केली आहे. गौरव वसंत दगडे (२०, रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हा प्रकार २६ जुलै रोजी घडला आहे. याबाबत १४ वर्षाच्या पिडीत मुलीच्या कुटूंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपी गौरवला अटक केली आहे. अधिक तपास सिहंगड रोड पोलिस करत आहेत.
लोणावळ्यामधील धक्कादायक प्रकार
मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याने एकट्या जाणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. सदर घटना शुक्रवारी (ता. २५ जुलै) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली येथे घडली आहे. या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित तरुणीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.