धावत्या शिवशाही बसला भीषण आग; बसचालकाला समजलं अन् लगेचच... (संग्रहित फोटो)
पुणे : हडपसर भागातील मांजरी येथील मोकळ्या जागेत शेडमध्ये उभारण्यात आलेल्या स्पीकर्स बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना पहाटे घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, कारखाना या आगीत जळून खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांजरी खुर्द येथे मोकळ्या जागेत जवळपास ६ हजार स्केवअर फुटामध्ये पञे व लोखंडी अँगलने कारखाना उभा केला होता. याठिकाणी मोठ- मोठे स्पीकर बनविण्यात येत होते. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक कारखान्यातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ ही माहिती येथील नागरिकांनी अग्निशमन दल व पोलिसांना दिली. लागलीच पुणे पीएमआरडीए अग्निशमन दलाचे चार फायर बंब व पाण्याचे टँकर दाखल झाले. तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. पुर्ण कारखान्याला आगीने विळखा घातलेला होता. आग मोठ्या प्रमाणात पसरलेली होती. जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. पण, स्पीकर्ससाठी लागणारे प्लाऊड तसेच जाळी व इतर प्लास्टीक वस्तू असल्याने आग भडकलेली होती.
जवानांनी अर्धा ते पाऊन तास अथक पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. तरीही जळत्या लाकडाचे निखारे निघत होते. जवानांनी पाण्याचा मारा करून कुलिंग ऑपरेशन सुरू केले. दरम्यान आगीत कोणी कामगार अडकले आहे का याची खाञी केली. जेसीबीच्या साह्याने शेडलगत असणारे पञे बाजूला करुन जवानांनी आत प्रवेश केला. पाहणी केली असता त्यात कोणीही अडकलेले नसल्याचे दिसून आले. दरम्यान, या आगीत संपुर्ण कारखाना जळाला, असल्याचे सांगण्यात आले. आगीत सीएनसी मशीन्स, कटींग मशीन, स्पीकर, एम्लिफायर्स, प्लॉयवुड, रंगाचे डबे, फायबर साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रीक वायरिंग असे साहित्य जळाले. या आगीचे कारण समजू शकले नाही.
हे सुद्धा वाचा : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 83 लाखांना घातला गंडा
पुण्यातील इमारतीत भीषण आग
राज्यात आगाीच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या काही दिवसाखाली कोंढवा येथील एनआयबीएम रस्त्यावरील आलिशान इमारतीतील फ्लॅटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ज्येष्ठ दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाले असून, त्यात ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. तर, त्यांच्या बहिणीचे पतीही गंभीर जखमी झाले आहेत.