संग्रहित फोटो
राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक मामा आणि त्याच्याच भाच्याच्या पत्नीने मिळून भाच्याची निघृण हत्या केली आहे. अनैतिक संबधात अडथळा येत असल्यामुळे मामाने भाच्याला कट रचून संपवले आहे.
मगराम येथील छतौनी गावातील रहिवासी रामफेर नावाचा तरुण १८ सप्टेबंरच्या सकाळी घरातून निघून गेला होता. तो परत आलाच नाही. दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह घरापासून दीड किलोमीटर अंतरावर एका फ्लॉटिंग साईटजवळ इंदिरा कालव्याच्या जवळ असलेल्या नाल्यात आढळून आला. त्याच्या गळ्यावर जखमा होत्या. तसेच गळा आवळल्याचे निशाण होते. शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न झाले. रामफेरच्या भावाने रविवारी पोलिसांत हत्येची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरु केला असता अनेक महत्वातचे पुरावे त्यांच्या हाती लागले.
तपासादरम्यान पोलिसांनी रामफेरची पत्नी मीरा हिच्यावर संशय घेतला. यानंतर रामफेरचे मामा बसंत लाल याचेही नाव समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तेंव्हा या घटनेचा खुलासा झाला. आरोपी बसंत लाल ने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, रामफेरच्या घराशेजारी त्याची बहीण राहते. बसंतलाल अनेकदा बहिणीच्या घरी येत- जात असे. याचदरम्यान त्याचे रामफेरची पत्नी मिरा हिच्याशी संबध जुळले. दुसरीकडे रामफेरला दारुचे व्यसन होते. अनेकदा दारु पिऊन तो मिराला मारायचा. याचदरम्यान रामफेरला मिरा आणि बसंतलाल यांच्याविषयी संशय आला. आणि तो त्यांच्या संबंधाला विरोध करु लागला. या गोष्टीला कंटाळून मीरा आणि बसंतलालने रामफेरला संपवण्याचा कट रचला.
बसंतलाल त्याच्या मित्रासह घटनास्थळी पोहोचला. त्याने रामफेरला तिथे बोलावून दारु पाजली. रामफेर नशेत असताना बसंतलाल आणि त्याच्या मित्राने त्याला पकडले आणि एका कपड्याने त्याचा गळा आवळला. रामफेर बेशुद्ध झाल्यानंतर नाल्यात बुडवून त्याची हत्या केली. त्यानंतर रामफेरचा मोबाईल घेऊन दोघे फरार झाले. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून. अधिक तपास सुरु आहे.
भररस्त्यात एकावर कोयत्याने सपासप वार
स्वारगेट भागात दुधानी गँगने दहशत माजवली आहे. मोक्का रिर्टन आणि सराईतांनी दहशत माजवून एकावर कोयत्याने वार केले आहेत. कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही केला आहे. नंतर परिसरात हवेत हत्यारे फिरवून दहशत माजवत गोंधळ घातला. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास डायसप्लॉट येथे ही घटना घडली. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांची दहशत कायम असल्याचेही दिसत आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भक्तीसिंग दुधानी, शक्तीसिंग दुधानी, गोविंदसिंग टाक, आकाशसिंग दुधानी याच्यासह सात जणांविरोधात भारतीय न्याय संहिता १०९, १८९, १८९(२), १९१(२), १९१(३), आर्म ४ (२५), मपोका ३७, (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आबा सरोदे (वय ३९) यांनी तक्रार दाखल केली आहे.