 
        
        धुळे पेट्रोल पंपावर सशस्त्र रॉबरी करुन 50 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
Crime News: धुळे : साक्री तालुक्यातील गंगापूर गावाजवळ असलेला जिओ पेट्रोल पंपावर पहाटेचा थरार दिसून आला आहे. यावेळी बंदुकीचा धाक दाखवत रॉबरी करण्यात आली. गुरूवारी (दि.30 ऑक्टोबर) पहाटे चार ते पाच वाजेदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या सशस्त्र रॉबरीमध्ये चोरांनी ५० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
हा पेट्रोल पंप दिलिप नांगरे यांच्या मालकीचा आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक वळवी या अधिकाऱ्यांसह तपास पथक पटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रम समजावून घेण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा करत पुरावे जमा करण्यात आले, पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून संशयित दरोडेखोरांना लवकरच ताब्यात घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
धुळे जिल्ह्यात यापूर्वीही महामार्ग, राज्यमार्ग आणि निर्मनुष्य तसेच आडरस्त्यावर शस्त्र दाखवून लहान मोठ्या किंवा जबरी चोरी झाल्याचा घटना घडल्या आहेत. अनेक घटनांचा तपास पोलिसांनी अवघ्या काही तासातच लावून संशयितांना ताब्यात घेतले आणि मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पोलिसांतर्फे ऑपरेशन ऑल आउट’ सुरू असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळ्यामध्ये चोरट्यांना वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कायमचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
या धुळ्यातील घटनेनंतर पोलिसांनी भूमिका मांडली आहे. धुळ्यातील पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले की,
या रॉबरीमधे पोलिसांना तब्बल १.५ तास उशिरा ११२ वर कॉल आला होता. तरी तपासात काही क्लू मिळाले आहेत. लवकरच अपडेट देण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत ऊस जळून खाक
तळोदा येथील विजयकुमार कोतीलाल सेंडे यांच्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रावर लावलेला ऊस शेतात शॉर्ट सर्किट झाल्याने जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेंडे यांचे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर विजयकुमार कांतीलाल शेंडे (वय ४६) यांच्या मालकीचे तीन एकर (सर्वे नंबर २८१/०२) शेत असून त्यांनी उसाची लागवड केली होती. वर्षभर शेतात राबून त्यांनी उसाची व्यवस्थित निगा घेतली. दरम्यान आता लवकरच कारखाने सुरू झाल्यावर उसाची तोड करण्यात येणार होती. पण काही दिवसांपूर्वी शेतामध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे संपूर्ण तीन एकर ऊस हा जळून खाक झाला. त्यात अंदाजे १३० ते १४० टन ऊस जळाला आहे, यात त्यांचे सुमारे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत ऊस जळून खाक झाला.






