सपा नेते आजम खान यांच्या मुलाला शिक्षा
उत्तर प्रदेशच्या रामपूर कोर्टाने सुनावली शिक्षा
पिता-पुत्र दोघेही आहेत तुरुंगात
उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. समाजवादी पार्टीचे नेते आजम खान आधीच तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. दरम्यान त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबासाठी आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या रामपूर कोर्टाने (Court)आजम खान यांचा मुलगा अब्दूला एका प्रकरणात तब्बल 7 वर्षांची शिक्षा (Crime)सुनावली आहे. हे प्रकरण दोन पासपोर्ट आणि पॅन कार्ड याच्याशी संबंधित आहे.
उत्तर प्रदेश येथील रामपुर कोर्टाने सपा नेते आजम खान यांचा मुलगा अब्दूला आजम याला दोन पासपोर्ट प्रकरणात 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. हे प्रकरण 2019 चे आहे. तेव्हाचे भाजपचे आमदार आकाश सक्सेना यांनी अब्दूला आजम आणि अन्य काहींविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आज सुनावणी पूर्ण झालयावर कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.
अब्दुल आजम यांच्यावर दोन पासपोर्ट तयार करणे आणि पॅन कार्ड तयार करण्याचा आरोप होता. एक वैध कागदपत्र आणि एक अवैध कागदपत्र तयार केले गेले होते. आज अब्दुल आजम यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने अब्दुल अजं याला 7 वर्षांची शिक्षा व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अब्दुल आजम यांनी केलेले गुन्हा हा समाज आणि राष्ट्रासाठी धोकादायक आहे. बनावट कागदपत्रांमुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे कोर्टाने म्हटले आहे. यामुळे अब्दुल आजम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पॅन कार्ड प्रकरणात तो आधीच जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याचे वडील आजम खान डेल तुरंगात शिक्षा भोगत आहेत.
आईने केला जावयावर खोटा हत्येचा आरोप
उत्तरप्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या जावयावर आणि मुलीच्या सासरकडच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. माझ्या मुलीला याच लोकांनी मारुन टाकलय. तिचा मृतदेह गायब केलाय असे गंभीर आरोप मुलीच्या आईने केले. या प्रकरणी तिने FIR देखील केले. पण मुलीचं सत्य समोर येताच आईला धक्काच बसला आणि सासरच्या मंडळींनाही आरोप खोटे निघाल्यामुळे दिलासा मिळाला. परंतु नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया.
Uttar Pradesh: आईने केला जावयावर खोटा हत्येचा आरोप; पण मुलगी जिवंत, दुसऱ्याशी लग्न करत…
तर घडलं असं, उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमधील राजवंती देवी यांनी पोलीस स्टेशनमध्ये ३ ऑक्टोंबरला एफआयआर नोंदवला. माझी मुलगी रुची हिला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळलं आहे. त्यांनतर तिची हत्या करून तिचा मृतदेह गायब केला असं गंभीर आरोप सासरच्यांवर लावले आहे. त्यांनतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Ans: दोन पासपोर्ट व पॅन कार्ड प्रकरणात अब्दुल आजम यांना कोर्टाने 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
Ans: 2019 मध्ये भाजप आमदार आकास सक्सेना यांनी तक्रार दाखल केली होती.






