महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १४ लाख १९ हजारांची रोकड लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये प्रवेश केला. त्यांनी कटरच्या साह्याने एटीएम मशीन फोडून त्यामधील 14.19 लाख रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
Neral News: मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, ₹4.78 लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळी एटीएममध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँक प्रशासनाने तातडीने माळेगाव पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली.
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि इतर तपास यंत्रणांची मदत घेतली आहे. चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पणदरेतील पेट्रो कंपनीचे एक एटीएम मशीन असून, हे मशीन फोडत त्यातून चोरट्यांनी ११ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रोकड लंपास केली. त्यात १०० रुपयांच्या १४१७, २०० रुपये दराच्या १५९० तर ५०० रुपये दराच्या १४६६ नोटांचा समावेश आहे. त्याच ठिकाणी हिताची कंपनीची दुसरी मशीन असून, त्यातून २ लाख २६ हजार ४०० रुपयांची रक्कम काढण्यात आली. दोन्ही मशीनमधून एकूण १४ लाख १९ हजार १०० रुपये लंपास करण्यात आले. तसेच एटीएम मशीन व सीडीएम मशीन फोडून नुकसान केले.
एटीएममध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड असताना चोरट्यांनी सहजपणे मशीन फोडून चोरी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ग्रामीण भागातील एटीएम केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
तरुणासह त्याच्या आई-वडिलांना बेदम मारहाण; धक्कादायक कारणही आलं समोर






