श्रीलंका: श्रीलंकेत केबल कारचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघाता एकूण ७ भिक्षुंचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यात वर्धेच्या बौद्ध भिक्षु ठकदरे यांचा समावेश आहे. ते एक वर्षाच्या धम्म विनयच्या साधनेसाठी गेले होते.
स्पा सेंटरच्या नावाखाली चेंबूरमध्ये वेश्याव्यवसाय; 14 वर्षीय मुलीसह तरुणीची सुटका
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील मेलसिरीपुरातील पानसियागामा येथील ना उयाना मठ (ना लियाना अरण्य सेनानाया) येथे हा अपघात घडला. अपघाताच्या वेळी मठात 13 बौद्ध भिक्षू केबल कारमधून प्रवास करी होते असे वृत्त आहे. केबल कारची केबल तुटून पडल्याने किमान सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. कुरुनेगाला रुग्णालयातील सूत्रांनी अदा डेराना यांना सांगितले की, केबल कारची केबल तुटून खाली पडल्याने किमान सात बौद्ध भिक्षूंचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी सांगितले की, काल रात्री (24) कुरुनेगाला येथील बौद्ध वन मठात झालेल्या अपघातावेळी केबल कारमध्ये सुमारे 13 बौद्ध भिक्षू प्रवास करीत होते.
अपघात मृत भिक्षुंपैकी किमान दोन परदेशी नागरिक आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील वर्ध्याचे बौद्ध भिक्षु वाकदरेंचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह गोकरेल्ला जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. ते वर्ध्याच्या तळेगांव मानव विकास साधना आश्रमचे आहेत. दरम्यान वर्ध्याच्या तळेगांव आणि परिसरातील नागरिकांनी प्रफुल्ल वाकदरे यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. मृतकांचे मृतदेह कुरुनेगाला शिक्षण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव कारची धडक; मंचरमध्ये भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद
दरम्यान, अपघाताची आणखी एक घटना पुण्यातून समोर आली आहे.परीक्षण देण्यासाठी महाविद्यालयात निघालेल्या विद्यार्थिनीला कारणे उडवल्याचे समोर आले आहे. अपघातात विद्यार्थिनीचा पाय फ्रॅक्चर झाला असून तिला गंभीर दुखपत झाली आल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या दृश्यांमध्ये कार चालकाची चूक असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं आहे. मात्र विद्यार्थिनी बाईक वरुन पडल्यानं अपघात झाला असून आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही, असं मंचर पोलीसांचं म्हणणं असल्यानं त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचं ही स्पष्ट होतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना २३ सप्टेंबरच्या सकाळी पुण्याच्या मंचरमध्ये पिंपळगाव फाटा परिसरात स्वामी समर्थ मंदिराजवळ हा अपघात घडला आहे. मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थिनीला भरधाव कारने जबर धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचा ऋतुजा चंद्रकांत पारधी (वय १९, राहणार पिंपळगाव-खडकी) असे आहे. या भीषण अपघाताचे थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. आणि स्पष्ट दिसत आहे.
कुत्रे भुंकल्याचा जाब विचारल्यामुळे राग अनावर; दोघांवर चाकूने सपासप वार केले अन्…