शिक्रापुरात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या; सकाळी कुटुंबीय उठवायला गेले अन्... (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक तलाठ्याने गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहराही दाखवू नका असे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत पत्नीच्या छळाने त्रस्त होऊन त्यांनी आत्महत्या केली. त्याने स्टेटस ठेवल्याने आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
मध्यरात्री चालत जाणं बेतलं जीवावर; भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहराही दाखवू नका असे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत पत्नीच्या छळाने त्रस्त एका तलाठ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील तेल्हाराच्या थार एमआयडीसी परिसरात रविवारी घडली. पोलिसांनी या प्रकरणी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शिलानंद माणिकराव तेलगोटे (३९, रा. शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा) असे मृत तलाठ्याचे नाव आहे. तो तेल्हारा तहसील कार्यालयांतर्गत हिवरखेड तळेगाव बाजार कार्यरत होता.
त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ‘व्हॉट्सॲप’वर एक स्टेटस ठेवले. त्यामधून आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. शिलानंद यांनी मृत्यूपूर्वीच्या स्टेटसमध्ये पत्नी आपला मानसिक छळ करते. मृत्यूनंतर चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, असेही नमूद केले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुनील भटकर यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. तेल्हारा पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
नेमकं काय लिहिलं होत स्टेटस मध्ये?
मला माझी पत्नी मुलासमोर शिव्या देत असून फाशी घे असे वारंवार म्हणते. तसेच माझ्या साळ्याकडे पैसे असून त्यापोटी मी व्याज भरतो आहे. माझ्या पगारातून कपात होत आहे. मी पाच दिवसांपासून जेवण केले नाही. माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीला माझा चेहरा देखील दाखवू नका, असे त्यांनी स्टेटस मध्ये लिहिले होते.
उपजिल्हाधिकाऱ्याला जीवे मारण्याचा पत्नीकडून प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक घटना समोर आली असून पत्नीने आपल्या मित्राच्या मदतीने चक्क उपजिल्हाधिकारी पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पत्नीने आई, भाऊ, घरातील मोलकरीण आणि मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवेंद्र कटके असं उपजिल्हाधिकारी यांचं नाव असून जादूटोणा करून विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
चाफे येथे भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला