फोेटो सौजन्य- सोशल मीडिया
SAIL Recruitment 2026: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबरी आहे. ‘स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’कडून यंगप्रोफेशन भर्ती अंतर्गत एकूण ४८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ‘अलॉय स्टील प्लांट’, ‘दुर्गापूर स्टील प्लांट’ आणि ‘आयआयएससीओ (IISCO) या वेगवेगळ्या प्लांटसाठी केली जाणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेद्वारांनी ६ जून २०२६ पर्यंत अर्ज करावेत. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे? अर्ज शुल्क किती असणार? तसेच अर्ज कुठे व कसा करावा? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया…
आवश्यक शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)
उमेद्वाराकडून कोणत्याही मान्यताप्राप्त कॉलेज किंवा विद्यापीठातून किमान ६५% गुणांसह पदवी असणे B.Tech / B.E. आवश्यक आहे.
उमेद्वाराची ही पदवी सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल, आयटी (IT), किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयांमध्ये असावी.
तसेच संबंधित विषयांमध्ये पद्व्युत्तर पदवी(Masters Degree) पूर्ण केलेले उमेद्वारही यासाठी पात्र आहेत. म्हणजेच M.Tech / M.E / MBA किंवा उच्च शिक्षण घेतलेले उमेद्वारही या पदांसाठी अर्ज करू शकतात.
1) इच्छुक उमेद्वाराने स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या ‘सेल’च्या sail.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भेट द्वावी.
2) होमपेजवर दिलेल्या ‘Careers’ या सेक्शनवर क्लिक करावे.
3) जर तुम्ही या वेबसाइटवर पहिल्यादा फॉर्म भरत असाल तर ‘वन टाईम रजिस्ट्रेशन’ (OTR) पूर्ण करावे.
4)आपले नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी माहिती भरून लॉगिन करावे.
5) नंतर अर्जात विचारलेली सर्व आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी.
6) नंतर मागितलेल्या सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी.
7)नंतर अर्ज शुल्क जमा करून योग्य माहिती भरली आहे का? याची खात्री करावी, नंतर फॉर्म सबमिट करावा.
8) भविष्यातील संदर्भासाठी याची प्रिंट काढून ठेवावी.
सेल यंग प्रोफेशनल भरती अंतर्गत सर्वप्रथम अर्ज केलेल्या उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट(CBT) म्हणजेच ऑनलाईन परीक्षा घेतली जाऊ शकते किंवा शैक्षणिक पात्रतेनुसार आणि सायकोमेट्रिक चाचणीद्वारे स्क्रिनिंग केले जाऊ शकते. या प्रक्रियेनंतर पात्र उमेद्वारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवले जाईल. येथे उमेदवारचे ज्ञान आणि कौशल्ये तपासून अंतिम निवड केली जाईल. ज्यांना पगार दरमहा १.४० लाख रुपयांपर्यंत उत्कृष्ट पगार दिला जाऊ शकतो.






